पुणे : खुनाचा प्रयत्न, दुखापत, चोरी, सोनसाखळी चोरी, विनापरवाना शस्त्र बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे, दहशत निर्माण करणे, मारहाण यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शहरातील दोन सराईत गुन्हेगारांना सोमवारी तडीपार करण्यात आले.

हेही वाचा – पुणे : लोहगावमध्ये बोगस डॉक्टरला पकडले, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची कारवाई

हेही वाचा – उच्चभ्रू भागातील महिलांशी अश्लील संभाषण; दिल्लीतून महिलेसह दोघे अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सनी संजय सपकाळ (वय २४, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) आणि मिथुन भरत बिरामणे (वय २५, रा. अष्टविनायक नगर, आंबेगाव पठार, पुणे) अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुंडांच्या गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना तडीपार करण्याचा प्रस्ताव स्थानिक पोलिसांनी पाठवला होता. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी त्यास मंजुरी दिली.