scorecardresearch

अंध विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यनिर्मितीचे यूजीसीचे निर्देश

संबंधित शैक्षणिक साहित्य विद्यापीठाच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून देण्याबाबतही स्पष्ट करण्यात आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पुणे : विद्यापीठ स्तरावर अंध, दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तके, श्राव्य पुस्तके अशा शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. संबंधित शैक्षणिक साहित्य विद्यापीठाच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून देण्याबाबतही स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या संदर्भात यूजीसीला पत्र दिले होते. या पार्श्वभूमीवर यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी संकेतस्थळावर परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठांनी अंध आणि दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तके, श्राव्य पुस्तके, मोठ्या अक्षरात मुद्रित केलेली पुस्तके आणि सहायक साधने उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी, जेणेकरून संबंधित विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी ते सहायक ठरू शकेल. हे साहित्य विद्यापीठाच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून द्यावे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ugc s guidelines for the production of educational materials for blind students zws

ताज्या बातम्या