भोसरीतील महिलेच्या खून प्रकरणातील अज्ञात आरोपीला काहीही धागेदोरे नसताना शोधून गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्हीतील चित्रणामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

हेही वाचा – पुणे : तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक

रामकिशन शंकर शिंदे (वय-२४, रा. कारेगाव, शिरूर, पुणे. मूळ राहणार हिंगोली) असे आरोपीचे नाव आहे. भोसरी लोंढेआळी येथील पूजा ब्रजकिशोर प्रसाद (वय-३१, मूळ राहणार, मुज्जफरनगर, बिहार) या महिलेचा काही दिवसांपूर्वी धारदार शस्त्राच्या सहाय्याने खून करण्यात आला होता. या प्रकरणातील अज्ञात आरोपीचा गुन्हे शाखा व गुंडाविरोधी पथकातील पोलिसांनी कसून शोध सुरू केला होता. घटना घडलेल्या परिसरातील २५० हून अधिक सीसीटीव्हींचे चित्रण पोलिसांनी तपासले. त्यानुसार, संशयित आरोपी दृष्टिपथात आला. रांजणगाव येथील चोरी प्रकरणातील आरोपी आणि या खुनातील आरोपी एकच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर आरोपी कारेगाव येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्याला अटक केली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपीने पैशासाठी या महिलेचा खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.

हेही वाचा – पुणे : ऊसतोडणी कराराचे उल्लंघन ८१ कारखान्यांची ३९ कोटींची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहायक पोलीस निरीक्षक हरेश माने यांच्यासह प्रविण तापकीर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, गणेश मेदगे, विजय गंभीरे, सुनील चौधरी, मयूर दळवी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, रामदास मोहिते, ज्ञानेश्वर गिरी, शुभम कदम, तौसीफ शेख आदींचा तपास पथकात समावेश होता.