scorecardresearch

पुण्यात मुसळधारा, शहर पुन्हा तुंबले

संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारासा ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

पुण्यात मुसळधारा, शहर पुन्हा तुंबले
शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले होते.

पुणे : पुणे शहरात गुरुवारी (२९ सप्टेंबर) संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह सुमारे अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील रस्ते पुन्हा तुंबले. सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. संध्याकाळी कार्यालये सुटण्याच्या वेळेलाच पाऊस झाल्याने घराबाहेर असलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

शहरात सकाळपासून कधी अंशत: ढगाळ, तर कधी निरभ्र आकाशाची स्थिती होती. गुरुवारी पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार दुपारीच काही भागांत हलक्या पावसाने हजेरी लावली होती. पिंपरी-चिंचवड शहरात दुपारी तीनच्या सुमारास काही भागात पाऊस झाला. पुणे शहर आणि परिसरासर संध्याकाळी साडेचारनंतर आकाशात मोठ्या प्रमाणावर ढग जमा झाले. संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारासा ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला पावसाचा जोर मोठा होता. सहाच्या सुमारास पाऊस ओसरला, पण तोवर शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले होते. त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे वाहतुकीची गती कमी झाल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या