22 September 2019

News Flash

स्वादिष्ट सामिष : मटन कुर्मा

मटण उकडायला ठेवल्यावर काजू, खसखस, बडीशोप, जिरे आणि खोवलेले ओले खोबरे एकत्र बारीक वाटून घ्यावे.

दीपा पाटील

साहित्य

ल्ल अर्धा किलो मटन, मद्रास कांदे, टोमॅटो, अर्धी वाटी खोवलेले ओले खोबरे, २ चमचे काजू, २ चमचे आले-लसूण वाटलेले, १ चमचा भाजलेली खसखस, पाव चमचा हळद, पाव चमचा बडीशोप, पाव चमचा जिरे, १ चमचा अख्खा गरम मसाला, २ चमचे तूप, मीठ.

साहित्य

कुकरमध्ये मटन शिजवून घ्यायचे आहे. परंतु ते शिजताना त्यात वाटलेले आले-लसूण, हळद आणि मीठ घालून त्याला तीन शिट्टय़ा करून घ्याव्यात. म्हणजे व्यवस्थित शिजेल तसेच त्याला मसाल्याचा चांगला स्वाद लागेल. मटण उकडायला ठेवल्यावर काजू, खसखस, बडीशोप, जिरे आणि खोवलेले ओले खोबरे एकत्र बारीक वाटून घ्यावे.  हे वाटण तयार होईपर्यंत तुमचा मटणाचा कुकर होईलच. एकीकडे कांदे आणि टोमॅटोही चिरून घ्यावे. शेवटी तूप गरम करून त्यात अख्खा गरम मसाला घालावा. त्यात चिरलेला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यावे. त्यानंतर त्यावर कुकरमधून शिजवलेले मटन घालावे. शेवटी खोबऱ्याचे वाटण घालून एक उकळी आणावी.

भातासोबत हा कुर्मा फस्त करावा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on August 21, 2019 4:28 am

Web Title: mutton korma recipe zws 70