आज रविवार अनेकांच्याच सुट्टीचा दिवस. सुट्टी म्हटलं की मस्तपैकी उशिरा उठणं आणि आवडत्या जेवणावर ताव मारणं आलंच. आता हे आवडतं जेवण कोणतं, तर बरेचजण उत्तर देतील चिकनचा बेत असणारं. तुम्हीही असाच बेत आखताय का? तर आज चिकनची एक स्पेशल रेसिपी ट्राय करा. या रेसिपीचं नाव आहे, चिकन तेरियाकी. बनवायला ही सोपी आणि अतिशय स्वादिष्ट अशी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. चला तर पाहुयात, कसे बनवायचे चिकन तेरियाकी

चिकन तेरियाकी साहित्य :

  • २ बोनलेस चिकन ब्रेस्ट, ३ चमचे मध
  • ४ चमचे सोया सॉस, अर्धा कप संत्र्याचा रस
  • २ चमचे तीळाचं तेल, १ इंच आले
  • १ चमचा बटर, १ चमचा भाजलेले तीळ
  • कांद्याच्या २ हिरव्या पाती, २ चमचे मैदा

चिकन तेरियाकी कृती :

एका पातेल्यात चिकन घ्या. ते व्यवस्थित स्वच्छ करून त्याचे तुकडे करून घ्या. आता मैदा सोडून बाकीचे जिन्नस चिकनमध्ये मिसळा. आले किसून घ्या. कांदापात चिरून घ्या.

चिकनला हे सर्व मिश्रण माखून मुरण्यासाठी ते फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवा. नंतर ग्रील पॅन गरम करून घ्या.

आता हे मुरवलेले चिकन मैद्यात घोळून दोन्ही बाजूंनी छान ग्रील करून घ्या. पातेल्यात उरलेले सॉसचे मिश्रण या चिकनवर घालून ते त्यातच शिजवून घ्या. वेगळे पाणी घालू नका.

हेही वाचा – चमचमीत स्टफ्ड चिकन पेपर्स, ‘ही’ रेसिपी ट्राय करुन तुमचा रविवार आणखी स्पेशल करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटी खाताना त्यावर कांदापात घालून खा.