Coconut Jaggery Barfi recipe In Marathi : दिवाळी म्हंटल की, फराळ हा सगळ्यात पहिला डोळ्यासमोर येतो. ताटात सगळे गोड पदार्थ दिसले की, कोणताही खाऊ आणि कोणता नको असं होऊन जातं. पण, बदललेल्या जीवनशैलीमुळे सध्या सगळेच हेल्दी पर्यायाच्या शोधात असतात. तर तुम्ही सुद्धा फराळात एखादा हेल्दी आणि टेस्टी पदार्थ करण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. सोशल मीडियावर @foodie_hmm या अकाउंटवरून नारळ, गुळाची बर्फी (Coconut Jaggery Barfi ) बनवण्याची सोपी रेसिपी दाखवली आहे. चला तर पाहुयात ही बर्फी कशी बनवायची ते…

साहित्य (Coconut Jaggery Barfi Ingredients) :

१. किसलेलं खोबरं

paneer popcorn recipe
Paneer Popcorn Recipe: पनीर लव्हर्स, ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! एकदा खाल, तर पॉपकॉर्नची खरी चव विसराल
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
papaya sheera for breakfast
मुलांसाठी नाश्त्यात बनवा पपईचा पौष्टिक शिरा; वाचा साहित्य आणि कृती
Nutritious ladoo of cashews and almonds
सकाळच्या नाश्त्यात मुलांना द्या काजू-बदामाचे पौष्टिक लाडू; पटकन वाचा सोपी रेसिपी
Nutritious paratha of ragi
एक वाटी पीठापासून बनवा नाचणीचे पौष्टिक थालीपीठ; पटकन वाचा सोपी रेसिपी

२. गूळ किंवा गूळ पावडर

३. मावा किंवा खवा

४. वेलची पूड

हेही वाचा…Diwali Special Protein Laddoos : यंदा दिवाळीत बनवा भरपूर प्रोटीन असणारे लाडू, फक्त ‘या’ चार बिया अन्…; तुमचे लाडू झटपट तयार

व्हिडीओ नक्की बघा…

कृती (How To Make Coconut Jaggery Barfi ) :

१. कढईत तूप आणि किसलेलं खोबरं थोडं भाजून घ्या.

२. नंतर त्यात गूळ किंवा गूळ पावडर घाला आणि मिक्स करा.

३. मावा किंवा खवा घालून मिक्स करा.

४. त्यानंतर त्यात वेलची पूड घाला आणि पुन्हा मिक्स करून घ्या.

५. मिश्रण घट्ट झाल्यावर साच्यात पसरवून घ्या आणि दोन तास सेट करण्यासाठी ठेवा.

६. त्यानंतर बर्फीप्रमाणे त्याचे काप करून घ्या.

७. अशाप्रकारे तुमची नारळ, गूळाची बर्फी तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @foodie_hmm या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

गूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

गूळ खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. गूळ हा रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करतो, त्यामध्ये भरपूर लोह उपलब्ध आहे. तसेच तो रक्त शुद्ध करण्यासाठी आणि ॲनिमियाचा सामना करण्यासाठी मदत करतो. कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे, हा मधुमेहाच्या रुग्णांसाठीदेखील एक चांगला पर्याय ठरतो. दिवाळीत इतर पदार्थात सुद्धा आपण साखर घालतो. मग या सर्व फराळाच्या पदार्थांना पर्याय म्हणून तुम्ही साखर न घालता नारळ, गूळाची बर्फी बनवू शकता, जी हेल्दी आणि टेस्टी दोन्ही असेल.

Story img Loader