How To Make onion potato Kachori In Marathi : संध्याकाळ झाली की, काहीतरी चमचमीत, चटपटीत खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही मॅगी, बिस्किटे, पास्ता, बटाटा किंवा कांदा भजी असा काहीतरी झटपट होणारा नाश्ता आपण बनवतो. आज तुम्ही क्रिस्पी आणि क्रंची स्नॅक्स खाऊ इच्छीता तर कांदा, बटाटा कचोरी तयार करा. हिवाळ्यात, संध्याकाळी ही गरमा गरम कचोरी तुम्हाला खुप आवडेल. कांदा, बटाटा कचोरी बनवण्याची रेसिपी सोशल मीडियावर एका युजरने शेअर केली आहे. चला तर कांदा, बटाटा कचोरी बनवण्यासाठी काय साहित्य लागेल जाणून घेऊ…

कांदा, बटाटा कचोरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य (Onion potato Kachori Ingredients) :

एक चिरलेला कांदा

एक चमचा हळद पावडर

एक चमचा मिरची पावडर

अर्धा चमचा मीठ

गरम मसाला

२ उकडून स्मॅश केलेले बटाटे

कोथिंबीर

१ वाटी मैदा

ओवा

चार चमचे तेल

पाणी

हेही वाचा…Amla Candy: मार्केटमध्ये मिळणारी आंबट, गोड ‘आवळा कँडी’ आता घरच्या घरी बनवा; रेसिपी आणि फायदे जाणून घ्या

व्हिडीओ नक्की बघा…

कांदा, बटाटा कचोरी बनवण्याची कृती (How To Make onion potato Kachori ) :

कचोरीच्या स्टफिंगसाठी, एका पॅनमध्ये तेल घ्या आणि त्यात हिरवी मिरची, चिरलेला लसूण, जिरं, कांदा, हळद पावडर, मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ आणि गरम मसाला घाला.

त्यानंतर त्यात उकडून स्मॅश केलेले बटाटे घालून मिक्स करा आणि हिरव्या कोथिंबिरीने सजवा.

कणिक मळून घेण्यासाठी एक वाटी मैदा, एक चमचा ओवा, चार चमचे तेल आणि पाणी घ्या.

कणिक मळून झाल्यानंतर व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे चार ते पाच छोट्या पुऱ्या लाटून त्याची एक मोठी पोळी बनवा.

त्यानंतर पोळी रोल करून घ्या आणि सुरीने त्याचे छोटे-छोटे गोळे करून घ्या.

सारण टाकून कचोरीला आकार द्या.

दोन्ही बाजू पूर्णपणे शिजेपर्यंत मध्यम गरम आचेवर तळा.

तुमची स्वादिष्ट बटाटा, कांद्याची कचोरी तयार (Onion potato Kachori).

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.तुम्ही ही रेसिपी लहान मुलांना डब्यामध्ये देऊ शकता किंवा सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता.