सध्या व्हीगन पदार्थ खाण्याचा ‘ट्रेंड’ अनेक तरुणांमध्ये किंवा ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचे आहे अशांमध्ये दिसत आहे. खरंतर बहुतेक भारतीय पदार्थ हे या आहारामध्ये सहज समाविष्ट होऊ शकतात. त्यापैकी महाराष्ट्रातील काकडीचा कोरडा हा पदार्थ नक्कीच येऊ शकतो. महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवला जाणारा काकडीचा कोरडा करायला अतिशय सोपा आणि तितकाच पौष्टिकदेखील आहे.
अनेक भागांमध्ये झुणका हा पदार्थ बनवला जातो. त्याचप्रमाणे हा काकडीचा झुणका किंवा कोरडा या पदार्थाची रेसिपी सोशल मीडियावर @diningwithdhoot या अकाउंट ने शेअर केली आहे. अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होणारा अत्यंत सोपा आणि स्वादिष्ट पदार्थ कसा बनवायचा ते पहा.
हेही वाचा : Recipe : पालकाला द्या लसणीचा खमंग तडका! कशी बनवायची ‘लसूणी पालक’ भाजी रेसिपी पाहा
काकडीचा कोरडा रेसिपी :
साहित्य
तेल
२ काकडी
१ हिरवी मिरची
बेसन/डाळीचे पीठ
मोहरी
हिंग
हळद
लाल तिखट
कोथिंबीर
मीठ
कृती
हेही वाचा : Recipe : उपवासाचा दिवशी बनवून बघ ही कुरकुरीत भजी; काय आहे रेसिपी पाहा…
सर्वप्रथम, काकडी आणि सोलून किसून घ्या.
किसलेल्या काकडीचे सर्व पाणी हाताने दाबून काढून वेगळे करा.
आता एका कढईमध्ये चमचाभर तेल घालावे.
तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी, हिंग, मिरच्यांचे तुकडे करून घालून घ्या. काही सेकंद सर्व गोष्टी तडतडू द्यावे.
आता यामध्ये हळद आणि लाल तिखट घाला आणि इतर पदार्थांसह परतून घ्या.
या फोडणीत किसलेल्या आणि पाणी काढून घेतलेल्या काडीचा किस घालावा.
काही वेळासाठी सर्व पदार्थ मंद आचेवर शिजवून घ्या.
आता काकडी शिजत येईल तेव्हा त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाणी व बेसन एकत्र करून तयार केलेले मिश्रण घालून घ्या.
पुन्हा एकादा सर्व पदार्थ व्यवस्थित ढवळून, शिजवून घ्यावे.
सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तयार काकडीचा कोरडा सजवून घ्यावा.
तयार आहे दहा मिनिटांमध्ये तयार होणारा सोपा आणि पौष्टिक काकडीचा कोरडा.
ही रेसिपी इन्स्टाग्रामवरून @diningwithdhoot अकाउंटने शेअर केल्यानंतर आत्तापर्यंत या व्हिडीओला १०. ३ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.