पालकाची भाजी करायला तशी सोपी असते. मात्र प्रत्येकालाच ती आवडते असे नाही. कुणाला त्याच्या हिरव्या रंगामुळे खावीशी वाटत नाही तर कुणाला चव आवडत नाही. मात्र तसं पाहायला गेलं तर पालक ही पालेभाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पालक, लसूण यांसारखे पदार्थ खरंतर हिवाळ्यात, थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाने खायला हवे.

परंतु, पालक म्हटलं की फक्त पराठा, नुसत्या पालकाची किंवा ताकातली भाजी, पालकाच्या पुऱ्या या पदार्थांच्यापुढे आपली गाडी सरकतच नाही. मात्र उद्या डब्याला देण्यासाठी खमंग लसणीची फोडणी घातलेली ही ‘लसूणी पालक’ भाजी नक्की बनवून पाहा.

हेही वाचा : Recipe : उपवासाचा दिवशी बनवून बघ ही कुरकुरीत भजी; काय आहे रेसिपी पाहा…

साहित्य

पालक
लसूण
कांदा
हिरवी मिरची
कोरडी लाल मिरची
जिरे
तूप
तेल
हळद
लाल तिखट
मीठ

हेही वाचा : Recipe : प्रोटीन आणि फायबरयुक्त असा पौष्टीक हिरवा ढोकळा; काय आहे रेसिपी, प्रमाण पहा…

कृती

सर्वप्रथम, पालक काही मिनिटांसाठी पाण्यामध्ये उकळून नंतर बारीक चिरून घ्या.
एका पातेल्यामध्ये चमचाभर तेल घालून तापू द्या. त्यामध्ये जिरे, बारीक चिरलेले लसूण, कोरडी लाल मिरची घालून सर्व गोष्टी तडतडू द्या.
आता त्या फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा.
कांदा शिजू लागल्यानंतर त्यामध्ये, हिरव्या मिरच्यांचे तुकडे किंवा थोडेसे लाल तिखट, हळद आणि बारीक चिरलेला पालक घालून सर्व पदार्थ व्यवस्थित ढवळून घ्या.
चवीनुसार मीठ घालावे.
तयार होणारी भाजी काही मिनिटे झाकून ठेवा.

पालक शिजेपर्यंत, भाजीला वरून लसणाचा तडका देण्याची तयारी करून घ्या.
एका लहानश्या पातेल्यात चमचाभर तूप घालून ते तापू द्यावे.
तूप तापल्यानंतर त्यामध्ये जिरे, थोडासा कांदा आणि लाल कोरड्या मिरच्या आणि लसूण घालून छान तडतडू द्यावे.
लसणाचा रंग बदलल्यानंतर, शिजलेल्या पालकाच्या भाजीवर ही खमंग फोडणी घाला.
सर्व पदार्थ एकदा व्यवस्थित ढवळून घ्या.
तयार आहे आपली, खमंग लसणीची फोडणी दिलेली, ‘लसूणी पालक’ भाजी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामध्ये तुम्हाला हवे तसे तिखटाचे प्रमाण ठरवावे.