महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. तोच न्याय खाद्यसंस्कृतीलाही लागू होतो. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, लोणची, पापड, भजे, बोन्डे यांचे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात. चला तर मग आज बनवुया खानदेशी वांगी बटाट्याची घोटलेली भाजी…

खानदेशी तडक्यात तयार केलेली ही वांग्या बटाट्याची भाजी खानदेशी भागात भरपूर प्रमाणात तयार करतात.हिरव्या रंगाची ही भाजी हिरव्या वाटणात अजून छान लागतात कोणतेही मोठे लग्न समारंभ असो ही भाजी असते जेवनात खास करून ही भाजी तयार केली जाते विशेषता म्हणजे यात हिरव्या कलरचे वाटण तयार करून ही भाजी तयार केली जाते वरण ,बट्टी, वांग्याची भाजी असते ती हीच भाजी असते. अगदी चवीला वेगळी आणि प्रेशर कुकरचा वापर केल्यामुळे पटकन तयार होणारी वांग्या बटाट्याची भाजी बघूया रेसिपी.

खानदेशी वांगी बटाट्याची घोटलेली भाजी साहित्य

  • ३०० ग्राम पांढरी वांगे
  • १ मोठा बटाटा
  • २ कच्चे टोमॅटो
  • १/२ कप कोथिंबीर
  • २ हिरव्या मिरच्या
  • ७-८ लसूण पाकळ्या
  • ४ छोटे कांदे
  • १ छोटा तुकडा आले
  • २ टेबलस्पून शेंगदाणा कूट
  • २ टेबलस्पून खोबऱ्याचा कीस
  • १/२ टीस्पून हळद
  • २ टेबलस्पून तेल
  • १ टीस्पून मोहरी,जीरे
  • चवीनुसार मीठ

खानदेशी वांगी बटाट्याची घोटलेली भाजी कृती

स्टेप १
सर्वात आधी वांगे घेऊन त्याचे काटे काढून घेऊ. मागचा थोडा डेट कट करून बाकी देठासहित वांगे लांब कट करून घेऊ.

स्टेप २
वांगे बटाटे कट करून तयार करून घेऊ. आता हिरवे वाटण तयार करण्यासाठी मिक्सरमध्ये कोथंबीर, कांदे,लसूण,आले हिरव्या मिरच्या टाकून एकदा फिरवून घेऊ.

स्टेप ३
नंतर त्यात हिरव्या रंगाचे टोमॅटो टाकून फिरवून घेऊ. आता फोडणीची तयारी करून घेऊ.

स्टेप ४
आता कुकरमध्ये तेल टाकून मोहरी जीरे टाकून घेऊ. हिरवं वाटण तेलावर परतून घेऊन. नंतर त्यात खोबऱ्याचा कीस शेंगदाण्याचा कूट टाकून परतून घेऊ. मीठ आणि हळद टाकून मिक्स करून घेऊ.

स्टेप ५
आता वांगी बटाटा टाकून व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून परतून घेऊ

स्टेप ६
गरजेनुसार पाणी टाकून कुकर बंद करून तीन शिट्ट्या घेऊ.

हेही वाचा >> हिवाळ्यातील खास पौष्टिक गाजराची सुकी भाजी, सकाळच्या गडबडीत लहान मुलांच्या टिफिनसाठी परफेक्ट भाजी

स्टेप ७
कुकर थंड झाल्यावर भाजी घोटनीने घोटून घेऊ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टेप ८
वांग्या बटाट्याची प्रेशर कुकरमध्ये पटकन तयार होणारी भाजी तयार आहे.