scorecardresearch

महाशिवरात्रीला उपवास करताय? मग घरच्या घरी ट्राय करा ही सोपी रेसिपी, चमचमीत पदार्थ खातच राहाल

बनाना वॉलनट लस्सी आणि खजूराचे लाडू तयार करण्याची साधी आणि सोपी रेसिपी समजून घ्या.

Easy Fasting Recipe For Maha Shivratri
महाशिवऱात्रीसाठी उपवासाचे पदार्थ कसे बनवायचे? (Image-Graphic Team)

Maha Shivratri 2023 Fasting Recipes : येत्या शनिवारी १८ फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा सण येऊ घातला आहे. महाशिवरात्री सण देशभारत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण महाशिवरात्रीला भक्तीभावाने तल्लीन झालेली माणसं उपवास करतात. उपवास योग्य पद्धतीने केल्यावर आरोग्यासाठी फायदेशीर नक्कीच ठरतं. बॉडी डिटॉक्स करण्यासाठीही याचा चांगला फायदा होतो. काही लोकं उपवासाला फळे, भाज्या आणि धान्यांचा समावेश असलेल्या पदार्थांचं सेवन करतात. मात्र, महाशिवरात्रीला उपवास करणाऱ्यांसाठी आता नवीन पदार्थांचं सेवन करण्याची चांगली संधी आहे. कारण न्यूट्रिशन्सने भरलेले चविष्ट पदार्थ कसे बनवायचे, याची सोपी रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बनाना वॉलनट लस्सी रेसिपी

न्यूट्रिशन्सने परिपूर्ण असलेली बनाना वॉलनट लस्सीची सोपी रेसिपी समजून घ्या. ही लस्सी दही, केळी, मध आणि अक्रोड. ही लस्सी प्या आणि दिवसभर स्वत:ला एनर्जेटिक ठेवा.
साहित्य – अर्धा कप लो फॅट दही, अर्धा कप दूध, हाफ बनाना, ३-४ अक्रोड (हेझलनट्स, बदाम किंवा पाईन नट्स), एक चमचा बिया, (फ्लॅक्स सीड्स (जवस) आणि तीळाचे मिश्रण), १-२ चमच मध

कृती – फूड प्रोसेसरमध्ये दही, दूध, फ्लॅक्स सीड्स (जवस), तीळ, वॉलनट्स, मध आणि बनाना टाका. मऊ आणि क्रिमी होईपर्यंत त्याचं मिश्रण करा. ते मिश्रण ग्लासमध्ये घ्या. त्यानंतर वोल्टास बेको रेफ्रिजरेटरमध्ये (NeoFrost™ Dual Cooling) थंड होईपर्यंत ठेवा. थंड झाल्यानंतर त्याच्यावर कापलेले अक्रोड ठेवा.

नक्की वाचा – गव्हाचा डोसा लय भारी, चपाती खाणे विसरून जाल, मग एकदा पाहाच डोसा बनवण्याची सोपी रेसिपी

खजूराचे लाडू

थंडीच्या दिवसातील दुसरी स्पेशल रेसिपी म्हणजे खजूराचे लाडू. खजूराचे लाडू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. महाशिवरात्रीला उपवास करणाऱ्यांसाठी ही रेसिपी एक जबरदस्त मेजवानी आहे. या खजूराच्या लाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रूट्सचा समावेश असतो. शेंगदाणे, खजूर आणि पॉपी सीड्स टाकून हे लाडू बनवले जातात. या लाडूंचे सेवन केल्यावर हृदयविकारापासून सुटका होऊ शकते. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात.

साहित्य – एक कप भाजलेले शेंगदाणे, खजूराचे चार तुकडे, चिमूटभर कार्डामोम सीड्स, एक चमच गूळ.
कृती – ग्रिंडरमध्ये शेंगदाणे आणि वेलची टाकून त्याची बारीक पावडर करा. बिया नसलेले खजूरही यात टाका. त्यानंतर पुन्हा त्याचं मिश्रण करा. चांगल्या पद्धतीने तयार झाल्यावर ते पुन्हा मिक्सिंग बाऊलमध्ये घ्या. मायक्रोवेव्हमध्ये २० सेकंदांसाठी गूळ ठेवा. मिश्रण तयार झाल्यानंतर हाताने मध्यम आकाराचे लाडू बनवा. त्यानंतर लाडूच्या वरील भागात बदाम आणि पिस्ता भरून घ्या.

मराठीतील सर्व रेसिपी ( Recipes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 17:23 IST