Maghi Ganesh Jayanti Special Modak Recipe : यंदा १ फेब्रुवारी २०२५ रोजी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी श्रीगणेशाची विधीवत पूजा करुन व्रत केले जाते. त्याचबरोबर नैवेद्य सुद्धा अर्पण केले जातात. बाप्पाला जास्वंद, दुर्वा आणि मोदक भरपूर आवडतात. तर माघी गणेश जयंती निमित्त तुम्ही बाप्पासाठी मोदक बनवणार असाल तर आम्ही तुमच्यासाठी गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक कसे बनवायचे याची रेसिपी घेऊन आलो आहोत.

साहित्य (Fried Modak ingredients)

एक वाटीभर गव्हाचे पीठ

अर्धा चमचा रवा

एक चमचा तेल

एक वाटी किसलेले खोबर

अर्धी वाटी गूळ किंवा आवडीनुसार साखर

साखर

वेलची

जायफळ

सुंठ

तेल

चवीनुसार मीठ

कृती (How To Make Wheat Modak)

एक वाटीभर गव्हाचे पीठ मळून घ्या आणि त्यात अर्धा चमचा रवा घाला.त्यात एक चमचा तेल आणि चवीपुरते मीठ घालून पीठ मळून घ्या.

एका भांड्यात एक वाटी किसलेले खोबर, अर्धी वाटी गूळ किंवा साखर, वेलची, जायफळ, सुंठ मिक्स करून घ्या.

नंतर गॅसवर कढई ठेवा. हे सगळे मिश्रण त्या कढईत घाला.

त्यानंतर गूळ वितळवून घ्या आणि मध्ये मध्ये मिश्रण हलवत रहा.

म्हणजे तुमचे सारण तयार होईल.

त्यानंतर तयार पिठाचे गोळे करून घ्या. त्यात सारण घाला आणि मोदकाचा आकार द्या.

कढईत तेल घ्या आणि मोदक तेलात कुरकुरीत तळून घ्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गव्हाच्या पिठाचे आरोग्यदायी फायदे

भारतीय लोक स्वयंपाकघरांमध्ये अनेक पदार्थ बनवण्यासाठी सर्वात जास्त रवा आणि गव्हाच्या पीठाचा वापर करतात. बहुतेक लोकांच्या आहारात गव्हाचा समावेश असतो. सकाळी नाश्ता किंवा रात्री जेवताना सुद्धा गव्हाच्या पिठाच्या पोळ्या खाल्ल्या जातात. कारण – गव्हाच्या पिठामध्ये जास्त फायबर असतात, ज्यामुळे भूक कमी लागते, वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते; तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.