संक्रांत जवळ आली की घरोघरी गोड पदार्थ आवर्जून केले जातात. थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा देण्यासाठी तीळ अतिशय फायदेशीर असतात. तीळामुळे शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते. तसेच तीळ हे प्रोटीन आणि ओमेगा ३ चा स्त्रोत असल्याने आरोग्य उत्तम राहण्यासाठी तीळ खाणे फायदेशीर असते. मकर संक्रांत हा महाराष्ट्र, गुजरात आणि देशाच्या बऱ्याच भागात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण. संक्रांत आली की आपण तिळा पासून वेगवेगळे पदार्थ करतो आज आपण पाहुयात गुळाचा गाजर हलवा कशी करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुळाचा गाजर हलवा साहित्य

  • ५०० ग्रॅम गाजर
  • ३ टेबलस्पून मील्क पावडर
  • १/२ लिटर दूध
  • १/२ मेजरींग कप गुळ
  • १ टेबलस्पून साजूक तूप
  • १ टिस्पून वेलची जायफळ पूड
  • २ टेबलस्पून काजू, बदाम काप

गुळाचा गाजर हलवा कृती

स्टेप १
प्रथम गाजरं स्वच्छ धुऊन फुड प्रोसेसर वर किसून घेतली.

स्टेप २
एका गॅसवर दूध ठेवले व दुसऱ्या साईडला तुपावर गाजर परतून घेतले.

स्टेप ३
मील्क पावडर थोड्या दूधात कालवून घेतली. व मील्क पावडर चे दूध, व आटवलेले दुध दोन्ही मिक्स करून घट्ट सर होईपर्यंत शिजवून घेतले.

स्टेप ४
घट्टसर झाल्यावर त्यात गुळ घालून शिजवून घेतले. काजू बदाम काप, वेलची जायफळ पूड घालून गॅस बंद केला. गाजर हलवा थोडा ओलसरच छान लागतो.

हेही वाचा >> Makar Sankranti Special: तिळाची खीर कशी बनवायची? ही घ्या १० मिनीटांत होणारी रेसिपी

स्टेप ५
तयार हलवा बाऊलमधे काढून गार्निश केला.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makar sankranti 2024 recipe gulacha gajar halwa recipe in marathi srk
First published on: 12-01-2024 at 14:12 IST