Ganesh Chaturthi Special Talniche Modak Recipe: गणशोत्सव उद्यावर येऊन ठेपला. गणपतीचा नैवेद्य म्हटलं की डोळ्यांसमोर येतात मोदक, घरोघरी मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. मोदक सगळ्यांनाच बनवायला जमतं असं नाही. अनेकांचे हे मोदक बिघडतात तर काहींना कमी वेळात नैवेद्य तयार करायचा असतो. यावेळी उकडीचे नाहीतक तळणीचे मोदक ट्राय करा, जास्तवेळ न घालवता नैवद्याचा पदार्थ तयार होईल.

तळणीचे मोदक साहित्य –

Ganesh Chaturthi 2024 Mava & Besan Modak Recipes
Modak Recipe : फक्त १५ ते २० मिनिटांत बाप्पासाठी करा मोदक; तोंडात टाकताच विरघळतील; रेसिपी पटकन लिहून घ्या
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Ganesh chaturthi 2024 khajur ladoo recipe in marathi
Ganesh chaturthi 2024: नैवेद्यासाठी बनवा स्वादिष्ट, पौष्टिक अन् करायलाही सोपे असे खजुराचे लाडू
tasty wheat flour modak
Modak Recipe: एक वाटी गव्हाच्या पीठात झटपट बनवा उकडीचे मोदक; तांदळाच्या मोदकांपेक्षा लागतील भारी
Ukdiche Modak Recipe
Ukdiche Modak : उकडीचे मोदक फुटतात? टेन्शन घेऊ नका, या टिप्स जाणून घ्या अन् बनवा स्वादिष्ट मोदक
ganesh chaturthi 2024 bhog for ganpati bappa naivedya recipes in marathi
बाप्पासाठी नैवेद्य काय दाखवायचा? तुम्हालाही हा प्रश्न असेल तर, जाणून घ्या बाप्पाचे आवडते १० पदार्थ
Ganpati Naivedya Recipes how to make semolina barfi ravyachi barfi prasad recipe
Naivedya Recipes: बाप्पाच्या प्रसादाला वाटीभर रव्याची करा मऊसूत बर्फी; सोपी रेसिपी लगेच नोट करा
tasty Bundi modak
बाप्पाच्या प्रसादासाठी झटपट बनवा बुंदीचा मोदक; नोट करा साहित्य आणि कृती

गव्हाचे पीठ – १ वाटी
बारीक रवा – पाव वाटी
तेलाचे मोहन – २ चमचे
सुक्या खोबऱ्याचा किस- पाऊण वाटी
खसखस – २ चमचे
पिठीसाखर – अर्धी वाटी
नेवची पूड – अर्धा चमचा
बदाम, काजू , पिस्ता पावडर – अर्धी वाटी
बेदाणे – पाव वाटी
तेल – २ वाट्या

तळणीचे मोदक कृती –

सगळ्यात आधी गव्हाचे पीठ, रवा आणि चवीपुरतं मीठ घालून घट्टसर कणीक भिजवून घ्यायची. हे पीठ भिजवताना यामध्ये तेल गरम करुन त्याचे मोहन घालावे म्हणजे मोदक खुसखुशीत होण्यास मदत होते.
एका पॅनमध्ये खोबरं आणि खसखस लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायची.
गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये सुकामेव्याची पूड आणि पिठीसाखर घालून सगळे चांगले एकजीव करावे.
शेवटी यात वेलची पूड आणि बेदाणे घालून सगळे चांगले हलवून एकजीव करावे.
मळलेल्या पीठाच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात.
या पुऱ्यांमध्ये गार झालेले सारण भरुन त्याला छान पाकळ्या करुन मोदक बनवावा.

हेही वाचा >> Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सव स्पेशल ‘केसर माव्याचे मोदक’ झटपट तयार होते ही रेसिपी

दुसरीकडे कढईत तेल तापायला ठेवून ते गरम होत आले की मोदक यामध्ये गोल्डन ब्राऊन रंगावर छान खरपूस तळून घ्यावेत.