24 September 2020

News Flash

बालकवींची आठवण ठेवा!

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ‘हे अमरविहंगम गगनाचा रहिवासी तो नीलसागरावरचा चतुर खलाशी’ असे बालकवींचे काव्यात्मक वर्णन केले आहे.

| July 13, 2015 02:08 am

‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालिचे’, ‘आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे, ‘गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी’ यांसारखी मराठी मनात रुंजी घालणारी अवीट गोडीची गाणी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोमरे ऊर्फ बालकवींची मराठीजनांना देणगी आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ‘हे अमरविहंगम गगनाचा रहिवासी तो नीलसागरावरचा चतुर खलाशी’ असे बालकवींचे काव्यात्मक वर्णन केले आहे. अशा या थोर निसर्गकवीची १२५ वी जयंती येत्या १३ ऑगस्टला आहे. त्याची आठवण ठेवून राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करावे, एवढीच माफक अपेक्षा आहे.
जयश्री कारखानीस, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2015 2:08 am

Web Title: remember balkavi
टॅग Poem
Next Stories
1 भावनगर राज्यस्थापना
2 सुताचा पीळ आणि बहुपदरी सूत
3 डॉ. भांडारकर आणि तुकाराम सोसायटी
Just Now!
X