राज्यात सध्या सर्वत्र सापांचा सुळसुळाट झाला असून त्यांना पकडण्याची मोहीम लवकरच राबवली जाणार आहे. त्यासाठी शेकडो सर्पमित्रांची आवश्यकता भासणार आहे. या मित्रांना ओळखपत्रे देण्याची मागणी शासनस्तरावर प्रलंबित होती. ती पूर्ण करण्याचे शासनाने ठरवले असून त्यासाठी खालील अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या मान्य असणाऱ्यांकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत.

१) किमान पन्नास साप पकडण्याचा अनुभव असलेल्या व त्याचा पुरावा सोबत जोडणाऱ्या मित्रालाच अर्ज करता येईल. त्यातले किमान २५ साप तरी विषारी असायला हवेत.

supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
hot temperature, reptiles, snakes affected, cold temperature, enters in citizen colony, marathi news, snake news, snake in uran, uran news, uran snake news,
उरण : उन्हाच्या तडाख्याचा सरपटणाऱ्या प्राण्यांना फटका, गारव्यासाठी नागरी वस्तीत शिरकाव
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

२) साप पकडताना वैध मार्गाचाच अवलंब करावा लागेल. पुंगी वाजवून अथवा दुधाचे आमिष दाखवून साप पकडले तर त्याचे ओळखपत्र तात्काळ रद्द केले जाईल.

३) धार्मिक आस्थेचा प्रचार व प्रसार करणारे मंत्र म्हणत साप पकडण्याची कृती कायदेशीर समजली जाईल.

४) साप पकडताना मित्राला इजा झाली तर त्यावरच्या उपचाराचा खर्च त्याला स्वत:च करावा लागेल पण सापाला इजा झाली तर त्यावरील उपचार सरकारतर्फे केले जातील.

५) आजकाल सापांच्या अनेक प्रजाती सामान्य कोण व सरकारी कोण हे ओळखू लागल्या आहेत. त्यामुळे त्याला पकडताना ओळखपत्र गळय़ात लटकवता येणार नाही.

६) पकडलेल्या सापाला गळय़ात लटकवून मुली-मैत्रिणींना ‘इम्प्रेस’ करणे खपवून घेतले जाणार नाही.

७) सापाची ‘कोस’ घरात अथवा खिशात ठेवणे हा शुभशकून मानला जातो. त्यामुळे त्याला मागणी आहे. सर्पमित्रांना ही कोस विकता येणार नाही. ती मिळाल्यावर शासकीय कोस भांडारात जमा करावी लागेल.

८) पकडलेला साप स्थानिक नेत्यांच्या दबावात येऊन त्यांच्या विरोधकांच्या घरात अथवा क्षेत्रात सोडण्याची कृती बेकायदा असेल. साप कुठे, केव्हा व कधी सोडायचा याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सरकारकडे असेल  त्याबाबत दिल्या जाणाऱ्या सूचना गुप्त ठेवण्याची हमी सर्पमित्राला द्यावी लागेल.

९) साप पकडताना ‘मैं तेरी खाल निकालूंगा’ असले वाक्य उच्चारता येणार नाही.

१०) पकडण्याचा ‘कॉल’ आल्यावर श्रीमंत किंवा गरीब असा भेदभाव न करता प्रत्येकाकडे तातडीने धाव घ्यावी लागेल. श्रीमंतांकडे साप पकडल्यावर त्यांनी राजीखुशीने काही पैसे दिलेच तर, नाही नाही म्हणत घेतले तरी चालतील पण पैशाची मागणी करता येणार नाही.

११) गुप्तधनाची लालसा बाळगणारे दुतोंडी सापाच्या शोधात असतात. त्यामुळे असा साप मिळाला तर त्याचे काय करायचे याचा निर्णय सरकारी पातळीवर घेतला जाईल.

१२) बिनविषारी साप थेट जंगलात सोडले तरी चालतील पण विषारी साप सोडण्याचा निर्णय सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून घ्यावा लागेल. सापाचे विष काढण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.

१३) साप पकडतानाची चित्रफीत व्हायरल करायची झाल्यास ‘शासनाच्या सौजन्याने’ असे त्यावर ठळकपणे नमूद करावे लागेल.

१४) सर्पमित्रांना शासनाच्या प्रत्येक कार्यक्रमात ओळखपत्रासह हजेरी लावणे अनिवार्य असेल.

१५) ओळखपत्राआधारे नोकरीत आरक्षण मागणार नाही असे हमीपत्र प्रत्येकाला लिहून द्यावे लागेल.

१६) अधिकृत सर्पमित्र म्हणून कर्तव्य बजावणाऱ्यांना कोणतेही मानधन दिले जाणार नाही अथवा शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यावी.