अभिनयासाठी दोनदा ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळवणारा टॉम हँक्स हा वयाच्या विसाव्या वर्षीपासून नाटकांत काम करू लागला. मग चार वर्षांनी त्याला चित्रपटांत संधी मिळाली. त्यानंतरचे त्याचे अनेकानेक चित्रपट आपल्याला माहीत आहेत. पण पुढे वयाच्या एकसष्टाव्या वर्षी टॉम हँक्सचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला.. त्यानंतर आठ वर्षांनी त्याच्या कादंबरीच्या प्रकाशनाची घोषणा होते आहे, हे मात्र जरा विचित्र वाटेल. एकसारख्याच नावाचे दोन टॉम हँक्स नाहीत ना? टॉम हँक्सचं नाव मोठ्ठय़ा अक्षरांत लेखक म्हणून छापायचं आणि खाली कुठेतरी ‘सहलेखक’ म्हणून दुसरंच नाव, असं तर नाही ना? अशा नाना शंका नक्की येतील. त्या ठीकच, कारण आपल्याला माहीत असलेला टॉम हँक्स फॉरेस्ट गम्प, सेिव्हग प्रायव्हेट रायान किंवा अलीकडे गाजलेला द दा विन्ची कोड या चित्रपटांतून अभिनय करणाराच असतो. वयाच्या विशीपासून शेक्सपिअरच्या नाटकांत कामं करणारा, चित्रवाणीवरल्या तीन मालिकांसाठी पटकथालेखन करणारा टॉम हँक्स आपल्याला माहीत नसतो. त्याच्या कथासंग्रहाची आवृत्ती भारतात गेली सुमारे चारेक वर्ष उपलब्ध असूनही तो अनेकांनी वाचलेला नसतो. याचं काय कारण असावं?

तो कथासंग्रह २०१७ सालचा. ‘अनकॉमन टाइप’ हे त्या संग्रहाचं नावच आतल्या सर्व १७ कथांचं सूत्र सांगणारं आहे.. सर्व कथा ‘टाइपरायटर’ या आता जुन्या / कालबाह्य ठरलेल्या टंकलेखन यंत्राशी या ना त्या प्रकारे संबंधित आहेत. त्याहीपैकी चार कथा तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बातमीदारी करणाऱ्या पात्रावर आधारित आहेत. आणखीही काही कथा महायुद्धकाळाशीच संबंधित आहेत. एका कथेचं छापील रूप एखाद्या एकांकिकेच्या संहितेसारखं (केवळ संवाद असलेलं) आहे, पण त्या संवादांमध्ये टाइपरायटरवरल्या बऱ्याच खुणांचाही सढळ वापर आहे. या खुणांचं फार कौतुक टॉम हँक्सला असावं. त्याच्या एका पात्राच्ं मूळ नाव मोहम्मद असलं तरी त्याचं लघुरूप ‘एमडॅश’ असं (टंकलिखित खुणेशी मिळतंजुळतं) आहे! टॉम हँक्स याला जुनीजुनी टंकलेखन यंत्रं जमवण्याचा छंद आहे हेही त्या कथासंग्रहाच्या निमित्तानं माहीत झालं. पण..

Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
lokrang article, book review, Noaakhali manuskicha avirat ladha, novel, mahatma gandhi, last days, Ramesh Oza And Shyam Pakhare,
माणुसकीच्या अविरत लढ्याची गोष्ट
sanket korlekar sister uma debut on star pravah new serial sadhi mansa
‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत झळकली प्रसिद्ध अभिनेत्याची बहीण; फोटो शेअर करत म्हणाला, “तू पहिल्यांदा टीव्हीवर…”

.. पण कथासंग्रहाचं स्वागत काही झालं नाही. समीक्षकांनी तर झोडच उठवली टीकेची. ब्रिटनच्या ‘गार्डियन’नं ‘हँक्स, बट नो थँक्स’ अशी थेट नकारघंटाच वाजवली, आपल्याकडल्या ‘स्क्रोल’नंसुद्धा ‘फक्त अभिनय केला तर नाही का चालणार?’ असा खवचट सूर लावला.

बातमी अशी की, तरीही टॉम हँक्स लिहितो आहे. होय, तरीही!

या आगामी कादंबरीचं नाव ‘द मेकिंग ऑफ अनदर मोशन पिक्चर मास्टरपीस’ असं आहे. दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमीच या कादंबरीलाही आहे. ‘कथांमधून टॉम हँक्सच्या चित्रपटांची आठवण अधूनमधून येतच राहाते’ अशी टीका कथासंग्रहावर झाली होती, इथे तर टॉम हँक्सनं चित्रवाणीसाठी पटकथा लिहिलेल्या ‘द बॅण्ड ऑफ ब्रदर्स’ ची पुनरावृत्तीच होण्याचा धोका अधिक.

पण तरीही टॉम हँक्स लिहितो आहे.

हे असं तरीही लिहीत राहाणं कठीण असतं, अनेकांसाठी. कारण एक पुस्तक पडलं की दुसऱ्याचा खर्डा स्वीकारला जाण्यासाठी अनेक प्रकाशकांचे उंबरे पुन्हा झिजवावे लागतात, असा या अनेकांचा अनुभव. टॉम हँक्ससाठी मात्र ते फारसं कठीण नसावं असं दिसतं. कारण ही त्याची आगामी कादंबरी अमेरिकेप्रमाणेच ब्रिटनमध्येही एकाच वेळी प्रकाशित होईल, पेन्ग्विन प्रकाशनगृ़हातर्फे या कादंबरी घोषणासुद्धा समारंभपूर्वक झालेली आहे. बरं कादंबरी काही लगेच ख्रिसमसमध्ये येणार असंही नाही- ती प्रकाशित होणार आहे २०२३ च्या मार्चमध्ये! तरीही, कादंबरीकार म्हणून टॉम हँक्सला आपण स्वीकारणार का, हा प्रश्न उरतोच.