scorecardresearch

भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पार्टी (BJP) हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष आहे. २०१४ सालापासून सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपाचे बहुमत मिळवत सत्ता राखली. नरेंद्र मोदी भाजपाचे सर्वोच्च नेते असून अमित शाह दुसऱ्या पातळीवरचे नेते मानले जातात. तर जेपी नड्डा हे भाजपाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) ४८ पैकी २३ जागा मिळाल्या. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत फूट पडली आणि त्यांची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इंडियन नॅशनल काँग्रेसबरोबर युती करत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली.

जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.

१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (Bhajapa) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थॅंवरचंद गेहलोत, शिवराजसिंग चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.
Read More
Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?

शाही ईदगाह आणि कृष्ण जन्मभूमी वादाचा भाजपा नेत्यांच्या भाषणात उल्लेख आढळत नसला तरी स्थानिकांमध्ये या विषयावर चर्चा होत आहे. मतदारांमध्ये…

maharashtra election
11 Photos
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात आज ८ जागांवर मतदान; ‘या’ उमेदवारांचा मतदार करणार फैसला

Lok Sabha 2024 phase 2 Election: महाराष्ट्रातील ८ मतदारसंघांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

solapur lok sabha 2024 marathi news
सोलापूरमध्ये चुरस वाढली, उभय बाजूने आक्रमक प्रचार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या मागील सलग दोनवेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांच्या कन्या, आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपसमोर…

Dhananjay Munde criticized Sharad Pawar over Maharashtra politics
Dhanajay Munde on Sharad Pawar: “तुम्ही केले ते संस्कार आणि…”; धनंजय मुंडेंचा शरद पवारांना टोला

२०१४ मध्ये जे केलं ते संस्कार आणि दादांनी जे केलं ती मात्र गद्दारी? असा प्रश्न उपस्थित करत बीडचे पालकमंत्री धनंजय…

Polling for the second phase of 88 seats in 13 states and central territories
लेख: दुसऱ्या टप्प्यातही कमी मतदानाची चिंता? प्रीमियम स्टोरी

या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपसमोर एक विचित्र समस्या आहे. ती म्हणजे २०१९ ची त्यांची आकडेवारी.  ती खूपच जास्त आहे…

congress and bjp campaign in solapur lok sabha constituency
सोलापुरात काँग्रेस व भाजपचा प्रचार शिगेला 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पाठोपाठ भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही प्रचारसभा येत्या २९ एप्रिल रोजी होणार आहे.

loksabha election
10 Photos
Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा उद्या दुसरा टप्पा; महाराष्ट्रासह देशातील ‘या’ मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे आणखी एकूण सहा टप्पे होणार आहेत.

Narendra Modi will End Reservation And Change Constitution Says BJP MLA
“मोदी आरक्षण संपवतील आणि संविधानही..”, भाजपा आमदाराच्या विधानाने खळबळ; पण Video संपतो तेव्हा काय घडतं?

BJP MLA Viral Video: बाडमेरच्या सभेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले तरी ते संविधान…

Uddhav Thackeray Shivsenas Manifesto
शेतकऱ्यांना कर्जमुक्त, शेतीच्या उपकरणांवरील जीएसटी माफ करणार; ठाकरे गटाच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याला ठाकरे गटाच्यावतीने वचननामा असे म्हटले आहे.

Congress flag
ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

vishal patil sanjay raut
“…म्हणून भाजपाने लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवला”, राऊतांचा विशाल पाटलांना टोला; म्हणाले, “त्यांच्यामागे…”

विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी महाराष्ट्र काँग्रेसमधील काही नेत्यांनी प्रयत्न केले, मात्र पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

Sangli Congress Melava
सांगलीत काँग्रेसच्या मेळाव्यात गोंधळ; विशाल पाटील समर्थकांची घोषणाबाजी

काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज या मतदारसंघातून कायम ठेवला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांचा सांगलीत आज मेळावा…

संबंधित बातम्या