scorecardresearch

Amazon Republic Day Sale: Alexa स्पीकरपासून किंडलपर्यंत मिळत आहे मोठी सूट; जाणून घ्या

Amazon Great Republic Day Sale : अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान खरेदीदारांना अनेक ब्रँड्सच्या प्रॉडक्ट्सवर ऑफर्स मिळत आहेत.

Amazon Republic Day Sale: Alexa स्पीकरपासून किंडलपर्यंत मिळत आहे मोठी सूट; जाणून घ्या
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

Amazon Great Republic Day Sale 2023 : अ‍ॅमेझॉनचा २०२३ या वर्षातील सर्वात मोठा सेल सुरु झाला आहे. रिपब्लिक डे सेल असे याचे नाव आहे. हा सेल २० जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे. यामध्ये खरेदीकरणाऱ्या ग्राहकांना अनेक ऑफर्स मिळत आहेस. अनेक गोष्टींवर भरघोस सूट देखील मिळत आहे. जर का तुम्ही तुमच्या घरासाठी काही वस्तू शोधात असाल तर या सेलमध्ये किंडल (Kindle), इको एअरबड्स (Echo earbuds), स्पिकर्स , स्मार्टवॉच , फायर टीव्ही स्टिक असे डिव्हाईस उपलब्ध असून यावर ऑफर्स देखील आहेत. तसेच या वस्तू तुम्हाला १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत.

Echo (4th Genreation)

इको (४ थी जनरेशन)मध्ये डॉल्बी आणि डीप बास म्युझिक येते. युजर्स त्यांची आवडती गाणी अ‍ॅमेझॉन प्राईम म्युझिक, स्पॉटीफाय , जिओ सावन, गाना या अ‍ॅपवरून इकोमध्ये लावू शकतात. हे इकोवर तुम्हाला या सेलमध्ये १,४९९रुपयांची सूट मिळणार असून तुम्ही हे प्रॉडक्ट ८,४९९ रुपयांना खरेदी करू शकता.

Echo Buds (2nd Gen)

इको बड्स हे TWS इयरबड्स यामध्ये ५.७ मिमीचे ऑडिओ ड्रायव्हर आणि तीन मायक्रोफोन्स असे फिचर येतात. हे अँड्रॉइड आणि आयओएस या सिस्टीमशी निगडित आहे. हे इको (२री जनरेशन )हे बड्स तुम्हला या सेलमध्ये ६००० रुपयांच्या सूटनंतर ५,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे.

हेही वाचा : Airtel Recharge Plan: एअरटेलने आणला सर्वात स्वस्त प्लॅन; ३५ रुपयांत मिळणार ‘इतका’ जीबी डेटा

Echo Dot (3rd Gen) 

यामध्ये इको डॉट या स्मार्ट स्पीकरसोबत Amazon स्मार्ट प्लगचा देखील समावेश आहे. यात युजर्स व्हॉइस कनेक्ट करू शकतात. तुम्ही अ‍ॅमेझोनच्या सेलमध्ये १६५० रुपयांची सूट मिळाल्यानंतर हे प्रॉडक्ट ४,८४८ रुपयांना खरेदी करू शकता.

Echo Dot (4th Gen) with clock

इको डॉट हे (४ थी जनरेशन) या प्रॉडक्टमध्ये घड्याळाचे फिचर देखील आहे. हा एक स्मार्ट स्पीकर आहे. याचे डिझाईन गोल आकाराचे आहे. स्मार्ट स्पीकर असल्याने काही अंतरावरून देखील याला तुम्ही ऑपरेट करू शकता. याला हिंदी आणि इंग्रजी भाषांना Alexa सपोर्ट असून यात आपोआपच नवीन फीचर्स कनेक्ट होतात. हा स्मार्ट स्पीकरवर तुम्हाला या सेलमध्ये ४९४ रूपये सूट मिळणार असून, ४,९९९ रुपयांना तुम्ही स्पीकर खरेदी करू शकता.

हेही वाचा : Amazon Republic Day Sale : Redmi पासून Realme पर्यंत ‘या’ स्मार्टफोनवर मिळतेय मोठी सूट; जाणून घ्या

Echo Dot (3rd Gen)

अ‍ॅमेझॉनच्या रिपब्लीक डे या सेलमध्ये इको डॉट (३ री जनरेशन ) या स्पीकरवर तुम्हाला ९८९ रुपयांची सूट मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा स्पीकर ३,४९९ रुपयांना खरेदी करू शकता. हा स्पीकरचा आवाज अलेक्साद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो. हा युजर्सना त्यांच्या घरातील उपकरणे स्मार्ट बनवण्यासाठी मदत करतो. हा स्पीकर तुमच्या आवाजाने सुद्धा कंट्रोल करता येतो.

Echo Show 5 (2nd Gen)

इको शो ५ हा स्पीकर ५.५ इंचाचा स्मार्ट स्पीकर आहे. Alexa द्वारे इंग्रजी व हिंदी भाषेत हा स्पीकर ऑपरेट करता येतो. यावर तुम्ही तुमचे आवडते चित्रपट , टीव्ही शो, म्युझिक अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि नेटफ्लिक्स वरून पाहू शकता. या स्पीकरवर ३,९५९ रुपयांची सूट असून तुम्ही हा स्पीकर ४,९९९ रुपयांना खरेदी करू शकता.

हेही वाचा : Jio Recharge Plan: जिओने आणला तीन महिन्यांच्या वैधतेचा सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या

Fire TV Stick 4K आणि Alexa Voice Remote

अ‍ॅमेझॉन फायर टीव्ही स्टिक हे डॉल्बी व्हिजन आहे. यात तुम्हाला ४ के आणि अल्ट्रा एचडी अशी व्हिडीओ क्वालिटी मिळते. हे अलेक्साच्या मदतीने ऑपरेट करता येते. या प्रॉडक्टवर तुम्हाला २,२७९ रुपयांची सूट मिळणार असून तुम्ही हे ३,६९९ रुपयांना खरेदी करू शकता.

Kindle (2022)

2022 मधील किंडल हे कमी वजनाचे आणि कॉम्पॅक्ट रचना असलेले प्रॉडक्ट आहे. याचा डिस्प्ले एकदम कागदासारखा आहे. हे डिव्हाईस एकदा चार्ज केले ६ आठवडे याची बॅटरी चालते. या सेलमध्ये या डिव्हाइसवर १,४९९ रुपयांची सूट असून तुम्ही हे डिव्हाईस ८,४९९ रुपयांना खरेदी करू शकता.

हेही वाचा : Amazon Republic Day Sale: Samsung पासून Redmi पर्यंत ‘हे’ स्मार्टफोन्स मिळतायत १५ हजारांपेक्षा कमी किंमतीत; जाणून घ्या फीचर्स

Amazon Smart Plug

अ‍ॅमेझॉनचा हा स्मार्ट प्लग तुम्ही तुमच्या कोणत्याही घरगुती उपकरणांना जोडू शकता. अलेक्साद्वारे याला व्हॉइस कनेक्ट करता येतो. पहिल्यांदा अलेक्सा अ‍ॅप ओपन करून प्लग इन करावे आणि नंतर तुम्ही घरगुती उपकरणे नियंत्रित करण्यासाठी व्हॉइस वापरू शकता. या उपकरणावर तुम्हाला १०० रुपयांची सूट मिळणार असून तुम्ही हे १,८९९ रुपयांना खरेदी करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 11:08 IST

संबंधित बातम्या