scorecardresearch

सततच्या नोटीफीकेशनमुळे त्रस्त आहात? क्रोममधील वेबसाईट अशा करा ब्लॉक

How To Block Websites In Chrome: लहान मुलांना चुकीच्या वेबसाईट्स बघण्यापासून थांबवण्यासाठी अशा वेबसाईटस करा ब्लॉक; जाणून घ्या सोप्या स्टेप्स

सततच्या नोटीफीकेशनमुळे त्रस्त आहात? क्रोममधील वेबसाईट अशा करा ब्लॉक
वेबसाईट ब्लॉक करण्याच्या स्टेप्स (Photo: Freepik)

How To Block Websites In Chrome: काम करताना अनेकवेळा लॅपटॉप किंवा मोबाईलवर सतत कोणत्याही वेबसाईटचे नोटिफिकेशन येतात, ज्यामुळे आपल लक्ष विचलित होतं. ऑनलाईन शॉपिंग करताना किंवा एखाद्या अ‍ॅपमध्ये लॉग इन करण्यासाठी आपण मेल आयडी किंवा फोन नंबर शेअर करतो. यामुळे आपला मेल आयडी किंवा फोन नंबर अशा वेबसाईट्सकडे सेव्ह राहतो आणि यावरून सतत नोटिफिकेशन पाठवले जातात.

सतत येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे अनेकजण त्रस्त असतात. तसेच लहान मुलांचा लॉकडाउनमुळे सुरू झालेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे फोनचा वापर वाढला आहे. त्यामुळे मुलांच्या हट्टापुढे पालकांनाही माघार घेत त्यांना मोबाईल द्यावा लागतो. अशावेळी सतत मुलांवर नजर ठेवणे कठीण असते. मुलं कोणतीही चुकीची वेबसाईट उघडू नयेत अशी चिंता पालकांना सतावत असते. या समस्येपासून आणि नोटिफिकेशनच्या त्रासापासून वाचण्यासाठी वेबसाईट ब्लॉक करणे या पर्याय उपलब्ध आहे. वेबसाईट ब्लॉक करण्यासाठी कोणत्या स्टेप्स वापरायच्या जाणून घ्या.

आणखी वाचा: घरबसल्या मोबाईलवर मिळवा डिजिटल वोटर आयडी; कसे डाउनलोड करायचे जाणून घ्या

क्रोमवरील कोणतीही वेबसाईट ब्लॉक करण्यासाठी पुढील स्टेप्स वापरा

  • ‘क्रोम वेब स्टोर’मध्ये ‘ब्लॉकसाईट’ पर्याय सर्च करा.
  • ‘अ‍ॅड टू क्रोम’ बटनावर क्लिक करून, ‘अ‍ॅड एक्सटेंशन’ पर्याय निवडा.
  • एक्सटेंशन डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यात ऑरेंज शिल्ड आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘गिअर आयकॉन’ पर्याय निवडा.
  • वेबसाईट ब्लॉक करण्यासाठी डाव्या बाजूला असणाऱ्या ‘ब्लॉक साईट्स पेज’ पर्याय निवडा. तिथे तुम्हाला ब्लॉक करायची आहे त्या वेबसाईटचा युआरएल सबमिट करा.

अशाप्रकारे तुम्ही कोणतीही वेबसाईट ब्लॉक करू शकता आणि सतत येणाऱ्या नोटिफिकेशनपासून सुटका मिळवू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 12:35 IST

संबंधित बातम्या