Aadhaar-Pan Link On Smartphone: शासनाने आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करण्याबाबत सक्ती केली आहे. ३१ मार्च २०२३ ही आधार-पॅन लिंक करायची शेवटची तारीख आहे. हे महत्त्वपूर्ण काम करण्यासाठी फक्त मोजकेच दिवस शिल्लक आहेत. सरकारी कामाला वेळ लागतो असे काहीजणांचे मत असते. या कारणामुळे लोक आधार-पॅन लिंकशी संबंधित काम करायला कंटाळा करतात. सर्वांसाठी आवश्यक असलेल्या कामाला गती मिळावी म्हणून शासनाने तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. म्हणजेच आता घरबसल्या स्मार्टफोनवर ठराविक रक्कम भरुन आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे शक्य आहे. स्मार्टफोनसह लॅपटॉप, कंम्यूटर अशा उपकरणांच्या मदतीनेही हे काम करता येते. आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक न केल्यास त्याची वैधता संपून जाईल आणि ते निरुपयोगी होईल. असे घडू नये यासाठी स्मार्टफोनद्वारे हे महत्त्वपूर्ण काम वेळेत पूर्ण करण्याची सोय सरकारने केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला १,००० रुपये शुल्क म्हणून भरावे लागतील. ३१ मार्च २०२३ नंतर ऑनलाइन पद्धतीने आधार-पॅन लिंक करत असल्यास १०,००० रुपये आकारले जाणार आहेत. अधिकचे शुल्क भरावे लागू नये यासाठी अंतिम तारीख येण्याआधी काम पूर्ण करणे आवश्यक आहे. ऑनलाइन पद्धतीने आधार-पॅन लिंक कसे करावे? आधार-पॅन लिंकिंग करण्याआधी इनकम टॅक्स विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे. तेथे व्यवस्थितपणे योग्य माहिती भरावी आणि लॉग इन करावे. जर असे करणे शक्य होत नसेल, तर पॅन नंबरच्या मदतीने नवीन अकाउंट तयार करावे. लॉन-इन करताना यूजर आयडीमध्ये पॅन नंबरचा वापर करावा. अशाच प्रकारे आधार कार्डसाठीच्या utiitsl.com / egov-nsdl.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊनही अकाउंट लिंक करणे शक्य आहे. या सरकारी वेबसाइट्सवर लॉन इन केल्यावर होम पेजवर ‘Link Your PAN with Aadhaar’ असे पॉप अप होईल.जर असे दिसत नसल्यास Profile settings option वर क्लिक करावे. त्यामध्ये Link Aadhaar असे लिहिलेले दिसेल.त्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर काही महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती भरावी लागेल. ती भरल्यानंतर तुमचे आधार-पॅन लिंक होईल. आणखी वाचा - Twitter चा सोर्स कोड झाला ऑनलाइन लीक; कंपनीचे संपूर्ण सोशल नेटवर्क धोक्यात सध्या हे काम करण्यासाठी १,००० रुपये शुल्क म्हणून घेतले जातात. नव्या आर्थिक वर्षापासून यामध्ये वाढ होणार आहे. मार्च २०२३ नंतर हे काम करण्यांना १०,००० रुपये भरावे लागतील असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. शासनाच्या माहितीनुसार, सध्या भारतामध्ये २० टक्के नागरिकांचे आधार-पॅन लिंकिंगचे काम अपूर्ण आहे.