scorecardresearch

Premium

Google Pixel 8 launch Live Streaming: आज लॉन्च होणार गुगल पिक्सेल ८ सिरीज; कुठे पाहता येणार लाइव्ह इव्हेंट? जाणून घ्या

८ ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल २०२३ सुरु होणार आहे.

how to watch google pixel 8 series live event
गुगल पिक्सेल ८ आणि गुगल पिक्सेल ८ प्रो स्मार्टफोन्स (Image Credit- google)

गुगलने आपल्या पुढील जनरेशनमधील फ्लॅगशिप स्मार्टफोन Pixel 8 सीरिजच्या अधिकृत लॉन्चिंगची तारीख जाहीर केली आहे. पिक्सेल ८ लाइनअप बेस आणि प्रो मॉडेलसह ऑक्टोबर २०२२ मध्ये रिलीज झालेल्या पिक्सेल ७ सिरीजची जागा घेण्यासाठी तयार आहे. गुगल आज आपली नवीन सिरीज पिक्सेल ८ सिरीज भारतात लॉन्च करणार आहे. लॉन्चिंगआधीच गुगल पिक्सेल ८ सिरीज प्री ऑर्डरसह फ्लिपकार्टवर लिस्टेड करण्यात आला आहे. सिरीज लॉन्च झाल्याच्या एका दिवसानंतर खरेदीदार ५ ऑक्टोबरपासून फोन प्री ऑर्डर करू शकणार आहेत. तसेच कंपनी पिक्सेल वॉच २ आणि पुढील जनरेशनचे पिक्सेल बड्स प्रो देखील लॉन्च करणार आहे.

गुगल पिक्सेल ८ सिरीज

८ ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल २०२३ सुरु होणार आहे. फ्लिपकार्ट स्मार्टफोन्सवर मिळणाऱ्या आकर्षक ऑफर्सबद्दल काही खुलासे देखील करत आहे. फ्लिपकार्टने नुकतेच बहुप्रतीक्षित अशी गुगल पिक्सेल ८ सिरीज वेबसाइटवर दाखवण्यास सुरुवात केली आहे. ”पिक्सेल ८ सिरीज. याची प्री-ऑर्डर ५ ऑक्टोबरपासून सुरू होईल.” शक्तिशाली अशा नवीन पिक्सेल फोनमध्ये गुगल AI आणि आतापर्यंतचा अ‍ॅडव्हान्स कॅमेरा असणार आहे. 

vivo launch v29 series in india
VIDEO: Vivo ने लॉन्च केले १८ मिनिटांमध्ये ५० टक्के चार्ज होणारे स्मार्टफोन्स; ५० मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह मिळणार…, एकदा पाहाच
Buy Apple Iphone 13 In Rupees 10 Thousand on Flipkart Big Billion Days Sale Check Amazing Offers and Finance plan EMI
१०,३९९ रुपयात खरेदी करा iPhone 13! Flipkart ‘बिग बिलियन डेज’ सेलच्या आधीच भन्नाट ऑफर, पाहा प्लॅन
one plus pad go features revaled on 19 september
OnePlus ने उघड केले ‘या’ नवीन टॅबलेटचे डिझाइन; कधी होणार लॉन्च? जाणून घ्या
honor 90 5g first sale started in amazon with offers
२०० मेगापिक्सलचा कॅमेरा असणाऱ्या Honor च्या स्मार्टफोनचा सेल ‘या’ प्लॅटफॉर्मवर आजपासून सुरु; ऑफर्स एकदा पाहाच

हेही वाचा : VIDEO: ४ ऑक्टोबरला लॉन्च होणार गुगल Pixel 8 सिरीज; ५० मेगापिक्सलसह मिळणार…, एकदा पाहाच

गुगल पिक्सेल ८ आणि गुगल पिक्सेल ८ प्रो प्रेस रेन्डर्स

याआधी WinFuture स्मार्टफोन्सचे प्रेस रेन्डर्स लीक झाले होते. प्रेस रेन्डर्सने आगामी लॉन्च होणारे दोन्ही फोन वेगवेगळ्या रंगात दाखवले आहेत. गुगल पिक्सेल ८ कदाचित चार वेगवगेळ्या तर गुगल पिक्सेल ८ प्रो तीन रंगांमध्ये लॉन्च होऊ शकतो. प्रेस रेंडरने पिक्सेल वापरकर्त्यांना परिचित असलेल्या डिझाइनमध्ये दोन्ही फोन दाखवले. डिझाइनमध्ये काही सूक्ष्म बदल करण्यात आले आहेत. दोन्ही फोन्समध्ये स्लिम बेझल आणि पंच होल नॉच डिझाइन देण्यात आले आहे.

कधी आणि कुठे पाहता येणार लाइव्ह इव्हेंट?

गुगल पिक्सेल ८ सिरीज आज लॉन्च होणार आहे. यामध्ये गुगल पिक्सेल ८ , पिक्सेल ८ प्रो , पिक्सेल वॉच २ आणि नेक्स्ट जनरेशन पिक्सेल बड्स प्रो देखील लॉन्च करणार आहे. गुगलचा हा इव्हेंट नागरिकांना लाइव्ह पाहता येणार आहे. पिक्सेल ८ सिरीजचा लॉन्चिंग इव्हेंट भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे. तुम्हाला हा इव्हेंट प्रमुख सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आणि YouTube वर लाइव्ह पाहता येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to watch google pixel 8 series launching live event you tube social media platforms check details tmb 01

First published on: 03-10-2023 at 10:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×