scorecardresearch

IND vs NZ 3rd T20 Live Streaming: भारत-न्यूझीलंड निर्णायक लाइव्ह सामना मोफत कसे पाहता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर

भारतीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड संघ यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामना पाहण्याचा घ्या मोफत आनंद…

IND vs NZ 3rd T20
IND vs NZ 3rd T20 पाहा मोफत सामना (Photo-Twitter)

IND vs NZ 2nd T20, Live Streaming: भारतीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड संघ यांच्यात सुरु टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज १ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. हा अखेरचा टी-20 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार असून ही मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. ज्यामुळे आज रंगणारा तिसरा सामना हा निर्णायक असणार आहे. आता तिसरा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघासाठी करो या मरो असाच असेल.

पहिल्या सामन्यांत न्यूझीलंडकडून २१ धावांनी पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यांत न्यूझीलंडवर ६ विकेट्सनी थरारक विजय मिळवला होता. भारत आणि न्यूझीलंड संघातील दुसरा टी-२० सामना लखनऊमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर ६ गडी राखून मात केली. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताकडून कर्णघार हार्दिक पांड्या १५ आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव २६ धावांवार नाबाद राहिले.

(हे ही वाचा : Samsung Galaxy Unpacked 2023 ईव्हेंटचा घरबसल्या घ्या लाईव्ह आनंद, जाणून घ्या कसं पाहता येणार?)

‘या’ टीव्ही चॅनलवर प्रसारित होणार T20 सामना

टी-२० मालिकेतील तिसरा सामना संध्याकाळी ७ वाजता खेळला जाणार असून भारत आणि न्यूझीलंड T20 मालिका प्रसारित करण्याचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह पाहू शकता.

लाइव्ह मॅच मोफत कशी बघता येणार?

या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही डीडी फ्री डिशवरील डीडी स्पोर्ट्स चॅनलवर पाहू शकता. यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही. तुमच्या घरी टाटा स्काय कनेक्शन असल्यास, तुम्ही टाटा प्ले अॅपवरही सामना पाहू शकता. यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क देखील लागणार नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 14:46 IST