scorecardresearch

Premium

जीमेलवर चुकून सेंड झाला मेल? चिंता करू नका; ‘या’ टिप्सने करता येणार अनसेंड

जर तुम्हाला तो ईमेल अनसेंड करायचा असेल, तर अशावेळी तुम्ही जीमेलचे खास अनसेंड फीचर वापरू शकता.

How to unsend a mail sent by mistake on Gmail
जीमेलवर चुकून पाठवलेला मेल कसा अनसेंड करायचा, जाणून घ्या सोपा मार्ग (Photo : Indian express)

आपण एका दिवसात अनेक लोकांना ईमेल पाठवतो. विशेषत: जर तुम्ही कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करत असाल, तर तुम्ही जीमेल आणि आऊटलूकद्वारे दररोज भरपूर लोकांना ईमेल पाठवता. कधीकधी असे होते की आपण एखाद्याला चुकीचा ईमेल पाठवतो किंवा ईमेल पाठविल्यानंतर आपला विचार बदलतो. मात्र यानंतर जर तुम्हाला तो ईमेल अनसेंड करायचा असेल, तर अशावेळी तुम्ही जीमेलचे खास अनसेंड फीचर वापरू शकता.

खूप कमी लोकांना माहित आहे की जीमेल आपल्या वापरकर्त्यांना त्यांनी चुकून पाठवलेले ईमेल अनसेंड करण्याची परवानगी देते. म्हणून आज आपण जीमेलवर ईमेल कसा अनसेंड करायचा हे जाणून घेणार आहोत. ईमेल पाठविल्यानंतर, तुम्हाला मेल अनसेंड करण्यासाठी थोडा वेळ मिळतो, हे लक्षात घेण्यासारखे आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
hunger strike, Rohit Patil, Health deteriorated, sangli
उपोषण सुरु करताच रोहित पाटलांची प्रकृती खालावली

जेव्हा तुम्ही एखादा ईमेल पाठवता तेव्हा तुम्हाला मेल पाठवण्याचा पर्याय दिसला असेल. येथे व्ह्यू मेसेज बरोबरच अनडूचाही पर्याय आहे. तुमचा ईमेल अनसेंड करण्यासाठी, तुम्हाला अनडूवर क्लिक करावे लागेल. याशिवाय यूजर्स त्यांना हवे असल्यास कोणताही मेसेज रिकॉल करण्याची वेळ देखील निवडू शकतात.

यासाठी तुमच्या जीमेल अकाउंट मध्ये लॉग इन करा आणि वरच्या उजव्या कोपर्‍यात सेटिंग्जवर जा. येथे तुम्हाला ‘सी ऑल सेटिंग्ज’चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा. आता अनडू सेंड फिचरवर टॅप करा आणि सेंड कॅन्सलेशन पिरियड निवडा. येथे तुम्हाला चार पर्याय मिळतील – ५, १०, २० आणि ३० सेकंद. पर्यायांपैकी एकावर क्लिक करा आणि नंतर खाली स्क्रोल करा. आता तुम्हाला सेव्ह वर क्लिक करावे लागेल.

कृपया लक्षात घ्या की हा अनसेंड करण्याचा कालावधी जीमेल मोबाइल अ‍ॅपवर ५ सेकंदांवर सेट केला आहे. ते बदलता येत नाही. आता जेव्हाही तुम्ही हा ईमेल पुन्हा पाठवाल, तेव्हा तुम्हाला तुमच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला एक पर्याय दिसेल ज्यामध्ये पाठवलेला पहिला संदेश लिहिलेला असेल.

डेस्कटॉपवरील जीमेल वापरकर्त्यांना डेस्कटॉपवर स्क्रीनच्या तळाशी डाव्या बाजूला आणि मोबाइलवर तळाशी उजवीकडे ब्लॅक बॉक्समध्ये अनडू लिंक दिसेल. एकदा तुम्ही ईमेल अनसेंड केल्यानंतर, तुम्ही तो मेल पुन्हा पाठवण्यापूर्वी एडिट करू शकता, त्यात बदल करू शकता किंवा नवीन ईमेल लिहू शकता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mail sent to gmail by mistake dont worry undo can be done with these tips pvp

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×