OnePlus Nord CE 3: वनप्लस या कंपनीने त्यांची नॉर्ड ही त्यांची सिरीज काही महिन्यांपूर्वी लाँच केली होती. या सिरीजमध्ये असे स्मार्टफोन्स होते की ज्यांची किंमत ही ३०हजार रुपयांपेक्षा कमी आहे. तर या सिरीजमधील फोनचे कोणकोणते फीचर्स लीक झाले आहेत ते आपण जाणून घेऊयात.

वनप्लस लवकरच या सिरीजमधील स्मार्टफोन लाँच करू शकते. या फोनमध्ये पॉवरफुल व चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा आणि पॉवरफुल प्रोसेसर असणार आहे. हा स्मार्टफोन नवीन डिझाईनसह बाजारात लाँच केला जाऊ शकतो. जो आधीच्या फोनच्या डिझाईनपेक्षा खूप वेगळा असेल.

हेही वाचा : Apple च्या iOS साठी लवकरच लाँच होणार व्हाट्सअँपचे ‘हे’ फिचर

हा फोन साधारणपणे काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या Realme 10 Pro या सिरीजमधील फोनसारखा दिसतो. यामध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा येणार आहे. चीनमध्ये लाँच झालेला हा Realme चा फोन भारतीय बाजारात लवकरच लाँच होणार आहे. टीपस्टर ऑनलीक्स आणि ९१ मोबाईल्स यांनी एकत्रितपणे वनप्लस नॉर्ड सीई ३ चा रेंडर रिलीज केला आहे. यामध्ये काळ्या रंगाचा रेंडर समोर आला आहे. या फोनच्या मागच्या कॅमेराच्या बाजूला दोन मोठे कटआउट्स आहेत. तुम्ही रेंडर प्रोटोटाइप समजू शकता मात्र लाँच होणारी सिरीज यापेक्षा वेगळी असू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहेत फीचर्स ?

या सिरिजमधील फोनचे फीचर्स ऑनलाइन लीक झाले आहेत. या फोनमध्ये ६.७ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले येऊ शकतो. हे डिव्हाईस Qualcomm Snapdragon 695 processor असलेले असेल. यात १२ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज येऊ शकते. याचा सेल्फी कॅमेरा हा १६ मेगापिक्सलचा असू शकतो. ५०००mAh इतकी या फोनच्या बॅटरीची क्षमता असेल. अहवालावर विश्वास ठेवला तर कदाचित या सीरिजचे फोन्स फेब्रुवारीमध्ये लाँच होऊ शकतात .