आयफोन १४ सीरीज लाँच होण्यापूर्वी सॅमसंगने अॅपलचे टेन्शन वाढवले आहे. कंपनीने आपल्या नवीन ऍड-ऑनमध्ये नवीन आयफोनची खिल्ली उडवली आहे. ३१ सेकंदांच्या जाहिरातीमध्ये, दक्षिण कोरियाच्या कंपनीने सॅमसंगच्या फ्लॅगशिप फोनच्या कॅमेरा इनोव्हेशनचा उल्लेख केला आहे आणि सांगितले आहे की लवकरच तुम्हाला कोणत्याही आयफोनमध्ये हे वैशिष्ट्य मिळणार नाही. मात्र, सॅमसंगने अॅपलची खिल्ली उडवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही नवीन आयफोन बाजारात येण्यापूर्वी दक्षिण कोरियाच्या कंपनीने अॅपलला अनेकदा ट्रोल केले आहे. सॅमसंगच्या या नवीन अॅड ऑनमध्ये Galaxy S22 Ultra आणि Galaxy Z Flip 4 पाहिले जाऊ शकतात . यामध्ये कंपनीने आपल्या फ्लॅगशिप फोनचे नाविन्यपूर्ण फीचर्स, कॅमेरा क्षमता इत्यादींचा उल्लेख केला आहे. इतकंच नाही तर या जाहिरातीमध्ये Apple इव्हेंटवर ट्रोल देखील करण्यात आलं आहे आणि आगामी आयफोन १४ मध्ये हा इनोव्हेशन उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं आहे. कंपनीच्या जाहिरातीची टॅगलाइन आहे "This innovation is not coming to an iPhone near you". (हे ही वाचा: २२६ रुपयांमध्ये मिळतोय Nokia 2660 Flip 4G मोबाईल; दोन डिस्प्लेसह मिळेल दीर्घकाळ बॅटरी बॅकअप) सॅमसंग आपल्या जाहिरातीत आयफोनला ट्रोल करत आहे, असे म्हणत आहे की कंपनी आपल्या Galaxy S22 Ultra मध्ये आयफोन पेक्षा चांगला रिझोल्युशन कॅमेरा देत आहे. याशिवाय, त्याच्या फ्लॅगशिप फोनमध्ये दिसणारे Moonshoot फीचर देखील जाहिरातीत हायलाइट करण्यात आले आहे. याशिवाय आपल्या जाहिरातीत दक्षिण कोरियाची कंपनी अॅपलला ट्रोल करत म्हणत आहे की, तुम्हाला आगामी आयफोनमध्ये नावीन्य अपेक्षित आहे, जे लवकरच होणार नाही. सॅमसंगचा अॅपलला ट्रोल करतानाचा व्हिडीओ सॅमसंगने आयफोन एक्स लाँच केल्यानंतर सुद्धा अॅपलला ट्रोल केले होते. आयफोन एक्समधून हेडफोन जॅक काढून टाकल्याने कंपनीने ट्रोल केले होते. तसंच, आता हेडफोन जॅक सॅमसंगच्या मिड आणि फ्लॅगशिप उपकरणांमध्ये उपलब्ध नाही आहे. यानंतर अॅपलने जेव्हा आयफोनच्या बॉक्समधून चार्जर हटवला तेव्हाही सॅमसंगने त्याची खिल्ली उडवली. आता दोन्ही कंपन्या फोनसोबत चार्जर देत नाहीत. या वर्षी लाँच झालेल्या सॅमसंगच्या अनेक मिड आणि बजेट फोनमध्ये तुम्हाला चार्जर मिळणार नाही.