Best Recharge Plan : जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया (Vi) या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी नवे रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. या कंपन्यांचे सध्याचे एका महिन्याचे रिचार्ज प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध आहेत. फक्त २८ दिवसांसाठी उपलब्ध असणारे हे प्लॅन मंथली प्लॅन म्हणून ऑफर करण्यात येतात. यावरून या कंपनीच्या ग्राहकांनी ट्राय (TRAI) म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाकडे तक्रार दाखल केली आणि यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर ट्रायने वोडाफोन, आयडिया आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांना ३० दिवसांसाठीचे प्लॅन लाँच करण्यास सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रायच्या आदेशानुसार या टेलिकॉम कंपन्यांनी ३० दिवसांचे रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. आता ट्रायकडुन या ३० दिवसांच्या रिचार्ज प्लॅन्सची यादी जारी करण्यात आली आहे. या रिचार्ज प्लॅन्सची किंमत किती आहे आणि त्यावर काय ऑफर आहे जाणून घेऊया.

आणखी वाचा : तुमचे गूगल अकाउंट सुरक्षित आहे का? ‘२ स्टेप व्हेरीफिकेशन’ प्रक्रिया काय आहे जाणून घ्या

जिओचा २५९ आणि २९६ रूपयांचा रिचार्ज प्लॅन

  • रिलायन्स जिओच्या या दोन्ही प्लॅनमध्ये ३० दिवसांची वैधता देण्यात आली आहे.
  • २९६ रुपयांच्या जिओ फ्रीडम प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल सुविधा उपलब्ध आहे.
  • याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस देखील उपलब्ध आहेत.
  • जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस, २५ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • हा रिचार्ज प्लॅन ३० दिवसांसाठी उपलब्ध आहे.
  • २५९ च्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा ऑफर केला जातो.
  • या प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि १०० एसएमएसची ऑफर उपलब्ध आहे.
  • ही ऑफर एका महिन्यासाठी उपलब्ध असते. म्हणजेच महिन्यात ३० किंवा ३१ जितके दिवस असतील तितके दिवस या प्लॅनवरील ऑफर उपलब्ध असतील.

एअरटेलचा १२८ आणि १३८ रुपयांचा प्लॅन

  • एअरटेलच्या १२८ रुपयांच्या प्लॅनमध्ये लोकल आणि एसटीडी कॉलसाठी २.५ पैसे प्रति मिनिट शुल्क आकारले जाते.
  • व्हिडिओ कॉलसाठी प्रति सेकंद ५ पैसे आकारले जातात. याशिवाय या प्लॅनमध्ये कोणताही फ्री डेटा उपलब्ध नाही. या प्लॅनची ​​वैधता ३० दिवसांची आहे.
  • 131 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील या ऑफर उपलब्ध आहेत, परंतु हे दोन प्लॅन्स पूर्ण महिन्यासाठी (३१ दिवसांसाठी) उपलब्ध आहेत हा फरक आहे.

आणखी वाचा : युट्यूब व्हिडीओ सुरू होण्याआधी दिसणार पाच जाहिराती? कंपनीने स्पष्टीकरण देत सांगितले…

वोडाफोन आयडियाचा १३७ आणि १४७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • वोडाफोन आयडियाच्या या दोन्ही प्लॅन्समध्ये कॉलसाठी २.५ पैसे प्रति सेकंद आकारले जातात.
  • तर स्थानिक, एसटीडी आणि आयएसडी एसएमएससाठी अनुक्रमे १, १.५:आणि ५ रुपये आकारले जातात.
  • दोन्ही प्लॅनमध्ये दिवसांच्या उपलब्धतेचा फरक आहे. म्हणजे १३७ रुपयांचा प्लॅन ३० दिवसांसाठी उपलब्ध होतो आणि १४१ रुपयांचा प्लॅन पूर्ण एक महिना म्हणजेच ३१ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vodaphone airtel jio launches 30 days recharge plan trai releases list know price pns
First published on: 16-09-2022 at 22:19 IST