आजवर आपण बऱ्याच लोकांना फोन मॉडेल्सवरून भांडताना पाहिले आहे. आयफोन चांगला की अँड्रॉइड फोन, हा प्रश्न आपण रोज ऐकतो. आयफोन्स हे एक प्रकारे स्टेटस सिम्बॉल आहेत, तर अँड्रॉइड फोन्स वापरायला अतिशय सोयीस्कर आणि कमी खर्चिक आहेत, हे तर आपण सर्वच जाणतो. मात्र अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या आयफोन आणि अँड्रॉइड फोनला एकमेकांपासून वेगळं सिद्ध करतात, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आयफोन आणि अँड्रॉइडमधला सर्वात मोठा फरक म्हणजे दोन्हीची ऑपरेटिंग सिस्टिम. फक्त अ‍ॅपल कंपनीच आयफोन बनवते आणि त्याची ऑपरेटिंग सिस्टीम आयओएस आहे, तर अँड्रॉइड हे गुगलचे उत्पादन आहे. मात्र, गुगलने आपली ऑपरेटिंग सिस्टीम स्वतःकडे न ठेवता जगभरातील इतर कंपन्यांना विकली आहे.

जीमेलवर चुकून सेंड झाला मेल? चिंता करू नका; ‘या’ टिप्सने करता येणार अनसेंड

एकच कंपनी आयफोन बनवते याचाही फायदा आहे. त्याच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये बग येत नाहीत आणि ही सिस्टीम हॅक करणे सोपे नाही. दुसरीकडे, अँड्रॉइड सर्वांकडे असल्याने, ते हॅक करणे सोपे आहे. यासंबंधी अनेक प्रकरणेही समोर आली आहेत. तसेच, अँड्रॉइड फोनप्रमाणे आयफोन हँग होत नाही. अँड्रॉइड फोन हँग होणे आता सामान्य झाले आहे.

जर आपला आयफोन खराब झाला, तर अ‍ॅपलच्या कोणत्याही स्टोअरमध्ये आपल्याला सहज सेवा उपलब्ध होते, मात्र अँड्रॉइड फोनमध्ये काही दोष असल्यास तो संबंधित कंपनीच्या स्टोअरमध्येच न्यावा लागतो.

आता Gmail चं स्टोरेज होणार नाही फुल, नको असलेले मेल आपोआप होणार डिलीट; जाणून घ्या जबरदस्त Trick

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामान्य बॅटरी बॅकअप असूनही, आयफोन एक युनिक ब्रँड आहे. त्याची वैशिष्ट्ये आणि लूक प्रत्येक फोनमध्ये जवळपास सारखाच असतो. असे असूनही, ऑपरेटिंग सिस्टीम आणि उत्तम सुरक्षा प्रणालीमुळे ते अँड्रॉइडपेक्षा वरचढ आहे. यामुळेच ग्राहक अँड्रॉइडपेक्षा महागडे आयफोन खरेदी करणे पसंत करतात.