25 September 2020

News Flash

‘यूएचडी फोर के’ची धम्माल!

हाताच्या तळव्यावर एचडी तंत्रज्ञान उपलब्ध झाले असले तरी मोठय़ा टीव्हीवर एखादा कार्यक्रम विशेषत: क्रिकेट किंवा फुटबॉलचे सामने पाहण्याची धम्माल

| March 3, 2015 06:27 am

हाताच्या तळव्यावर एचडी तंत्रज्ञान उपलब्ध झाले असले तरी मोठय़ा टीव्हीवर एखादा कार्यक्रम विशेषत: क्रिकेट किंवा फुटबॉलचे सामने पाहण्याची धम्माल काही औरच असते. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या एचडी आणि फोर के तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट टीव्हींना खूप मागणी आहे. पण त्या टीव्हीतील तंत्रज्ञानाची मज्जा घेण्यासाठी तसा सेटटॉप बॉक्स असणेही गरजचे आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या एचडी २के सेटटॉप बॉक्स सर्वत्र उपलब्ध आहेत. पण यापलीकडे जाऊन फोर के सेटटॉप बॉक्सही बाजारात दिसू लागले आहेत. टाटा स्कायने नुकताच आपला अल्ट्रा हाय डेफिनेशन (यूएचडी) ४के सेटटॉप बॉक्स बाजारात आणला आहे. खरे तर मागच्या वर्षीच कंपनीने या बॉक्सचे अनावरण केले होते. पण प्रत्यक्षात ग्राहकांपर्यंत तो वर्ल्डकपच्या निमित्ताने पोहोचवण्यात आला.

यूएचडी ४के प्रसारण
भारत आणि यूएईचा सामना सुरू असताना प्रेक्षकांच्या गर्दीत कॅमेरा नसल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, संपूर्ण स्क्रीनवर झळकणाऱ्या प्रत्येक रंगातील वेगळेपण अगदी सहज दिसणे हे ४केचे वैशिष्टय़ आहे. डिस्कव्हरीसारख्या वाहिन्यांवर तर एखाद्या प्राण्याच्या अंगावरील बारीकसारीक खुणाही स्पष्ट दिसतात. स्टँडर्ड डेफिनेशन, एचडी याहीपेक्षा अधिक चांगले चित्र या फोर के तंत्रज्ञानात पाहावयास मिळते.
सर्वसाधारणपणे २केच्या तुलनेत यूएचडी ४के सेटटॉप बॉक्स चारपट प्रभावी आहे. त्यामुळे ८.३ मेगापिक्सलवर यूएचडी ४केमध्ये टीव्हीवरील चित्र अधिक स्पष्ट आणि ठसठशीत दिसते. जवळपास वीस फुटांवरूनही तुम्ही टीव्ही पाहत असाल तरी तुम्हाला चित्र पिक्सलेट झालेले पाहायला मिळणार नाही. तसेच या सेटटॉप बॉक्समध्ये एचडी २के स्ट्रीमच्या तुलनेत फुल एचडी ब्रॉडकास्ट १३ सेकंद जलद होणार आहे. तुम्ही कोणत्याही कोपऱ्यातून टीव्हा पाहत असाल तरी त्याची स्पष्टता कायम राहते. यूएचडी ४के सेटटॉप बॉक्सवर टीव्ही पाहण्याचा आनंद म्हणजे, तुम्ही जवळपास १० मेगापिक्सलच्या पुढचे चित्र त्याच्या मूळ आकारात पाहात आहात, असा अनुभव येतो. सध्याच्या तंत्रज्ञानामध्ये एखादे चित्र आपल्याला लांबून वेगळे दिसते म्हणून जवळ जाऊन पाहिल्यास त्याचे पिक्सलेट म्हणजेच ठिपके ठिपके दिसतात. पण या तंत्रज्ञानामध्ये तुम्ही लांबून जे पाहाल तेच तुम्हाला जवळूनही दिसेल. एकही चित्र पिक्सलेट झालेले दिसणार नाही. यामध्ये आवाजाचा दर्जाही खूप चांगला देण्यात आला असून डॉल्बी डिजिटल आणि ७.१ सराउंड साउंड देण्यात आला आहे. या तंत्रज्ञानावर भारत आणि यूएईचा सामना पाहात असताना तो विविधांगाने तपासण्यात आला. टीव्हीच्या वीस फुटांवरून सामना पाहिला तरी चित्रामध्ये कोणताही फरक जाणवत नव्हता. तसेच एका टीव्हीवर स्टँडर्ड डेफिनेशन आणि फुल एचडी तंत्रज्ञानातील वाहिन्यांवर सामने पाहण्याची सोय होती. यामुळे त्यातील फरक अगदी सहज जाणवत होता.
किंमत काय :
टाटा स्कायने नवीन ग्राहकांसाठी यूएचडी फोर केची सुविधा ६४०० रुपयांमध्ये तर सध्या टाटा स्काय असलेल्या ग्राहकांसाठी ५९०० रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 6:27 am

Web Title: uhd 4k
टॅग Technology
Next Stories
1 घरबसल्या जगाची सफर
2 डेटामय भारतीय
3 अँड्रॉइडचे ‘बेस्ट’ ब्राउजर
Just Now!
X