प्रदुषण रोखण्यासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी कार्बन मुक्ती ही देशाला नव्हे, जगाला त्याची गरज आहे. काश्मीरमध्ये पल्ली नावाचे गाव पंतप्रधानांच्या आदेशावरुन कर्बमुक्त करण्यात आले आहे. अशाच पध्दतीने ठाणे जिल्ह्यातील १२१ गावे आदर्शवत, १५ गावे कार्बन मुक्त करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामासाठी केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाच्या माध्यमातून १५ कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील यांनी रविवारी येथे दिली.

हेही वाचा >>>डोंबिवलीत देसले पाड्यातील तरुणांकडून वाहन चालकाला बेदम मारहाण

रोटरी क्लबने या उपक्रमात सक्रिय सहभाग दाखविला तर १५ गावे कर्बमुक्त करण्या बरोबर ठाणे जिल्ह्यातील १२१ गावांचा आदर्श गाव म्हणून विकास करणे एकाच टप्प्यात शक्य होणार आहे, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.रोटरी क्लब कल्याणतर्फे माती, जल, पर्यावरण संवर्धानावर एका परिषदेचे बालक मंदिर शाळेत आयोजन केले होते. यावेळी समारोपाच्या कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला रोटरीचे प्रांतपाल कैलास जेठाणी, परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, प्रकल्प प्रमुख मनीषा कोंडसकर, निखील बुधकर, जितेंद्र नेमाडे, कैलास देशपांडे, डाॅ. शुश्रृत वैद्य, नितीन मचकर, बिजू उन्नीथन उपस्थित होते.

हेही वाचा >>>ठाणेकरांपुढे पाणी टंचाईचे संकट ?

केंद्र सरकारच्या आदिवासी मंत्रालयातर्फे आदिम आदर्श ग्राम विकास योजना जाहीर झाली आहे. या योजनेसाठी देशातील ७०० जिल्ह्यांचा विचार करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील १२१ गावे आदर्श योजनेसाठी निश्चित करण्यात आली आहेत. दोन टप्प्यात या गावांचा विकास करण्याचे नियोजन आहे. रोटरी क्लब पर्यावरण, जल संवर्धन, शिक्षण, सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असते. रोटरीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामाचा विचार करता आता रोटरीने स्थानिक विषयातून बाहेर येऊन आदर्श भारत कसा असावा याचा विचार करुन कर्बमुक्त भारत, स्वच्छ भारत अभियान सारख्या कार्यक्रमात उतरले पाहिजे. यामुळे भारत देशाबरोबर रोटरीचे नावही उज्जवल होणार आहे, असे मंत्री पाटील म्हणाले.

ठाणे जिल्हा शहरी ग्रामीण भागात विभागला आहे. शहरी भाग विकसित, आदिवासी, ग्रामीण भाग अविकसित आहे. ही दरी दूर करण्याचे महत्वाचे काम पूर्ण करण्यासाठी रोटरीने पुढाकार घेणे आवश्यक आहे. रोटरी सामाजिक कार्यासाठी एक कोटी ६० लाखाचा निधी देते. त्या निधीत केंद्र सरकारच्या एक कोटी निधीची भर पडली तर मोठे काम गावांमध्ये उभे राहणार आहे. गावे स्वयंपूर्ण होणार आहेत. केंद्रीय पंचायत राज मंत्रालय आणि रोटरीने सामंजस्य करार करुन जिल्ह्यातील १२१ गावे आदर्शवत, १५ गावे कर्ब मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. द्रवीभूत गॅस, स्वच्छता अभियान ही येत्या काळाची गरज आहे, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा >>>ठाणे : सात तासानंतर वाहतूक कोंडी सुटली

ठाणे जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींमध्ये १२१ ग्रामपंचायती आदर्श झाल्या तर देशात जिल्ह्याचे नाव होईल. या योजनेचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील, असे पाटील म्हणाले.पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून ग्राम विकासाला रोटरी सर्वाधिक प्राधान्य देत आहे. १५ रोटरीे क्लबने एकत्र येऊन आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात ४५० लहान बंधारे बांधले आहे, असे अध्यक्ष बल्लाळ यांनी सांगितले.यावेळी ईशा फाऊंडेशनचे तुषार महाडिक, आर फाऊंडेशनच्या डाॅ. लता केळशीकर उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.