भारती अक्सा इन्शुरन्स कंपनी मधून आम्ही बोलतो. तुमची आमच्या खासगी विमा कंपनीत पाॅलिसी आहे. त्या पाॅलिसी बंद करुन तुमचे साठवण पैसे तुम्हाला परत करण्यासाठी साहाय्य करतो, अशी बतावणी करत एका भामट्याने कर्मचाऱ्यांनी कल्याण मधील एका नोकरदाराची ४५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

ब्रम्हानंद रामकृष्ण उपाध्याय (५६, रा. मीनाक्षी सोसायटी, बेतुरकरपाडा, कल्याण) अशी फसवणूक झालेल्या नोकरदाराचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कल्पना यादव, विनय सिंग, अग्निहोत्री, रोहित वैद्य यांच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये हा प्रकार घडला आहे.

हेही वाचा: बदलापुरात सोमवार ठरला सर्वात गार दिवस; तापमान पोचले १० अंश सेल्सियसवर

पोलिसांनी सांगितले, ब्रम्हानंद उपाध्याय आणि त्यांची पत्नी लिलादेवी यांच्या दोन पाॅलिसी भारती अक्सा विमा कंपनीच्या माध्यमातून काढण्यात आल्या होत्या. इंडिया फर्स्ट लाईफ इनशुरन्स कंपनीची एक पाॅलिसी होती. ठराविक मुदतीनंतर या पाॅलिसी बंद होऊन त्याची ठेव रक्कम उपाध्याय यांना मिळणार होती.

दरम्यान, मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये उपाध्याय यांच्या मोबाईलवर एक फोन आला, मी भारती अक्सा विमा कंपनीतून बोलते. तुमची आमच्या कंपनीतील पाॅलिसी बंद करुन तुमची रक्कम तुम्हाला परत करण्यासाठी साहाय्य करतो असे महिला कर्मचाऱ्याने सांगितले. उपाध्याय यांना आरोपींनी सतत संपर्क करुन पाॅलिसी बंद करण्यासाठी काही रक्कम भरणा करावी लागेल असे सांगितले. वस्तू व सेवा कर, पाॅलिसी रद्द करण्याचा अधिभार नावाने उपाध्याय यांच्याकडून ४५ हजार १०० रुपये उकळले. आरोपींनी त्यांना ही रक्कम उज्जीवन फायनान्स बँक बेलूर, कोलकत्ता, आयडीबीआय बँक, गाझियाबाद, आयसीआयसीआय बँक दिल्ली येथील बँकेतील खात्यात जमा करण्यास सांगितले होते.

हेही वाचा: उध्दव ठाकरे समर्थकांची कल्याण पूर्वेतील शाखा पालिकेकडून जमीनदोस्त; शिंदे पिता-पुत्रांच्या दबावाने कारवाई झाल्याचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व प्रकारची रक्कम भरणा करुनही दीड वर्ष झाले तरी पाॅलिसी बंदची रक्कम परत मिळत नसल्याने आणि आरोपींनी उपाध्याय यांना प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ब्रम्हानंद उपाध्याय यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.