कबुतरांना उघड्यावर खाद्य पदार्थ टाकू नका, असे आवाहन करत तसे करताना आढळून आले तर पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. या संबंधीचे फलक संपुर्ण शहरात प्रभाग समितींच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत. कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुमुळे आजार होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे पालिकेने फलकांवर स्पष्ट केलेले आहे. यामुळे पालिका विरुद्ध प्राणीप्रेमी असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा- ठाण्यात रविवारी महारोजगार मेळाव्याचे आयोजन; सुमारे ५ हजार पदांसाठी होणार मुलाखती

ठाणे महापालिका क्षेत्रातील काही चौक तसेच मोकळ्या जागांवर कबुतरांना खाद्य पदार्थ टाकले जाते. इमारतींच्या खिडक्यांमध्येही कबुतर आसरा घेत असून त्याठिकाणी कबुतरांना अनेक रहिवाशी खाद्य पदार्थ टाकतात. परंतु याच कबुतरांपासून सावधान राहण्याचे आवाहन करत त्यांना खाद्य पदार्थ टाकण्यास पालिका प्रशासनाने मनाई केली आहे. या संबंधीचे फलक शहरातील विविध भागात पालिका प्रभाग समितींच्या माध्यमातून लावण्यात आलेले असून हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. कबुतरांना उघड्यावर खाद्य पदार्थ टाकू नका असे आवाहन या फलकांद्वारे करण्यात आलेले असून त्याचबरोबर खाद्य पदार्थ टाकताना आढळून आल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. यापुर्वी करोना काळातही पालिका प्रशासनाने अशा प्रकारचे फलक लावले होते. मात्र, त्याच्या अंमलबजावणीबाबत पालिकेकडून ठोस कारवाई होताना दिसून आली नाही. त्यानंतर पालिका प्रशासनाने आता पुन्हा अशाचप्रकारची फलकबाजी सुरु केली आहे.

हेही वाचा- “आपल्याकडे निष्ठेची तर, त्यांच्याकडे सौदेबाजीची मंडळी”; माजी आमदार सुभाष भोईर यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

खाद्य पदार्थ टाकण्यास बंदी का ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुमुळे ‘हायपर सेंसिटिव्ह न्युमेनिया’चा (एचपी) आजार बळवण्याचे प्रमाण पुण्यासह मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फुफ्फुसांशी संबंधित आझार झालेल्यांमध्ये ‘हायपर सेंसिटिव्ह न्युमेनिया’ हा आजार होण्याचे सर्वाधिक प्रमाण ६० ते ६५ टक्के आहे. त्यामुळेच कबुतरांना उघड्यावर खाद्य पदार्थ टाकू नका असे पालिका प्रशासनाने फलकांद्वारे म्हटले आहे.