ठाणे : शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत आणि त्यांना चांगले शिक्षण मिळावे, या उद्देशातून ठाणे महापालिका शिक्षण विभागाने नुकतीच एक मोहीम राबविली. यामध्ये शहराच्या विविध भागांत पथकांमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १२१ शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत. त्यापैकी ५५ मुले शाळेत कधीच गेलेली नाहीत तर, उर्वरित ६६ मुले अनियमितपणे शाळेत जात असल्याची बाब समोर आली आहे. या सर्व मुलांना शाळेत प्रवेश देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ६७ बालवाडी, ११७ प्राथमिक आणि २२ माध्यमिक शाळा चालविण्यात येतात. या शाळांमध्ये एकूण ३५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून महापालिका शाळेच्या पटसंख्येत घट होऊ लागली आहे. पालकांचा इंग्रजी शाळांकडे ओढा वाढला आहे. यामुळे पालिकेने इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या आहेत. तसेच पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सीबीएसई शाळा सुरू करण्याचे प्रस्तावित केले असून त्याचबरोबर इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचेही प्रस्तावित केले आहे.

हेही वाचा – बारावे येथेच कल्याण न्यायालयाची नवी इमारत उभारणे सोयीस्कर; सार्वजनिक बांधकाम विभागाचा शासनाला अहवाल

इंग्रजी शाळा सुरू करण्याबरोबरच मराठी माध्यमातील शाळांचे बळकटीकरण करण्यावर पालिका भर देत आहेत. असे असतानाच, शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत आणि त्यांना चांगले शिक्षण मिळावे, या उद्देशातून ठाणे महापालिका शिक्षण विभागाने नुकतीच एक मोहीम राबविली. या मोहिमेसाठी पथके नेमण्यात आली होती. या पथकांनी शहराच्या विविध भागांत जाऊन शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला. सर्वेक्षणात १२१ शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत. त्यापैकी ५५ मुले शाळेत कधीच गेलेली नसल्याचे समोर आले असून यामध्ये मुलांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ३७ इतके आहे. तसेच ६६ मुले एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त दिवस अनियमितपणे शाळेत जात असल्याचे समोर आले असून यामध्येही मुलांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ३५ इतके आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

हेही वाचा – कल्याण-डोंबिवली पालिकेतील दहा अधिकारी चौकशी रडारवर

शाळाबाह्य मुलांची यादी

परिसर – शाळेत न गेलेली मुले – अनियमित शाळेत जाणारी मुले

कोपरी – १ – ४
कळवा-खारेगाव – ३९ – १६

कौसा, शिमला पार्क – ६ – ०
घोडबंदर – ० – २२

मानपाडा – १ – ७
वर्तकनगर – ४ – १

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकमान्य-सावरकर – ४ – १७
एकूण – ५५ – ६६