डोंबिवली- काटई-बदलापूर रोडवर मोर्या ढाब्या समोर बुधवारी रात्री साडे अकरा वाजता पंक्चर झालेल्या मोटारीचे चाक बदलण्याचे काम सुरू असताना त्या मोटारीला पाठीमागून आलेल्या एका वाहनाने जोराने धडक दिली. या धडकेत मोटारी जवळील उभे असलेले एक दाम्पत्य गंभीर जखमी झाले. या दोघांवर डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना, त्यापैकी पतीचा मृत्यू झाला.

हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर!

हेही वाचा : ठाणे : वृद्धेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

कुणाल रंजीत दावडा (३२, रा. जास्मीन, क्राऊन सोसायटी, खोणी तळोजा रोड, डोंबिवली पूर्व) असे तक्रारदाराचे नाव आहे. कुणालच्या तक्रारी वरुन पोलिसांनी अज्ञात वाहन चालका विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. देवेंद्र दंड हे अपघातात गंभीर जखमी झाल्याने ते मरण पावले. त्यांच्या पत्नीवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : प्रभाग कोणाचा बालेकिल्ला वैगरे नसतो; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला टोला

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार कुणाल दावडा, मयत देवेंद्र दंड, त्यांची पत्नी असे तिघे बुधवारी रात्री साडे अकरा वाजता काटई-बदलापूर रोडने मोटारीने जात होते. त्यांची मोटार या रस्त्यावरील मौर्या ढाब्या समोर येताच पंक्चर झाली. रात्रीच्या वेळेत जवळपास कोठेही पंक्चर काढण्याचे दुकान नसल्याने कुणाल, देवेंद्र यांनी रस्त्याच्या बाजुला मोटार उभी केली आणि टायर बदलण्याचे काम करीत होते. त्यावेळी देवेंद्र यांची पत्नी मोटारीच्या बाजुला उभी होती. पाठीमागून भरधाव वेगाने एक वाहन आले आणि त्याने  मोटीराला जोराची धडक दिली. या धडकेत देवेंद्र, त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले. कुणालने तातडीने एका वाहनातून देवेंद्र, त्यांच्या पत्नीला डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात नेले. त्यांच्यावर या रुग्णालयाचे प्रमुख डाॅ. मिलिंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने उपचार सुरू करण्यात आले. उपचारादरम्यान देवेंद्र यांचा मृत्यू झाला. तर, त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन मोटारीला धडक देऊन पती, पत्नी यांना गंभीर जखमी करुन पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या अज्ञात वाहन चालका विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरण तपासून पोलीस अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत आहेत.