क्राईम न्यूज / ठाणे : घोडबंदर भागात कामागारांच्या वसाहतीमध्ये एकाची अनेकदा जमीनीवर डोके आपटून निघृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी राज मल्होत्रा (२७) याला अटक केली. क्षूल्लक कारणावरून त्याने ही हत्या केल्याचे तपासात समोर आला आहे.
चंद्रमोहन (५३) असे मृताचे नाव आहे. घोडबंदर येथील गायमुख घाट परिसरात कंपनीची कामगार वसाहत आहे. या वसाहतीमध्ये राज मल्होत्रा आणि चंद्रमोहन राहत होते. बुधवारी रात्री मद्याच्या नशेत दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून कडाक्याचे वाद झाले. या वादातून राज मल्होत्रा याने चंद्रमोहन याचे डोके अनेकदा जमीनीवर आपटले. या घटनेची माहिती परिसरातील इतर कामगारांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ चंद्रमोहन यांना उपचारासाठी सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात दाखल नेले. त्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी राज मल्होत्रा याला अटक केली आहे. मद्याचे पैसे मागून चंद्रमोहन वाद घालू लागल्याने हत्या केल्याची कबूली राज मल्होत्रा याने दिली.
त्या दिवशी नेमके काय होते?
करत होता. तर चंद्रमोहन हा ट्रेलर चालक आहे. मद्याच्या नशेमध्ये चंद्रमोहन हा राजकडून मद्याचे पैसे मागू लागला होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये मोठे वाद निर्माण झाले. राज याने त्यांचे केस पकडले आणि जोर जोरात त्याचे डोके जमीनीवर आपटण्यास सुरुवात केली.
वाद सुरु असल्याने येथील एक कामगार आला असता, राज हा जमीनीवर डोक आपटत आपटत असल्याचे दिसले. त्याला त्या कामगाराने रोखले. चंद्रमोहन हा रक्तबंबाळ झाला होता, राज मल्होत्रा याला त्या कामागाराने चंद्रमोहनला का मारलेस असे विचारले असता, ‘वो मुझसे दारू पैसा मांगके झगडा कर रहा था, इसलिए मैने उसको जमीन पर सर पटक पटक कर मारा’ असे म्हणाला.