लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : विधानसभा निवडणुकी जाहीर होण्यापूर्वी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसने अकराशेहून अधिक निर्णय घेतले. विकास कामांच्या नावाखाली एक लाख कोटीची उधळपट्टी केली असल्याचा आरोप उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार आणि नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी गुरूवारी येथे केला.

डोंबिवलीतील मोठागाव खाडी किनारी ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी छठ पुजेचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमातील सहभागानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. विकास कामांच्या नावाखाली महायुती सरकारने कोट्यवधीची उधळपट्टी केली. यामुळे या सरकारमधील नेत्यांचे उत्पन्न १०० ते ७०० टक्के वाढले आहे. हे घोटाळेबाज सरकार आहे. महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आली की पहिले या घोटाळेबाजांवर कारवाई सुरू केली जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात

भाजपवर त्यांनी कडाडून टीका केली. भाजप नेत्यांनी बटेंगे तो कटेंगे अशी घोषणाबाजी केली आहे. स्वार्थासाठी विरोधी पक्ष नेते, पदाधिकाऱ्यांना फोडण्याचे काम ते करत आहेत. जनतेच्या अपेक्षांना त्यांनी पाने पुसली आहेत आणि राज्याची तिजोरी लुटण्याचे काम महायुती सरकारने केले आहे, असा आरोप खा. चतुर्वेदी यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काशी पंडित दीपक पांडे, आशुतोष पांडे, शिवम मिश्रा, प्रियांशु दुबे यांच्या उपस्थितीत छठ पुजेचा कार्यक्रम पार पडला. गंगा आरती यावेळी पार पडली. यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत, प्रदेश काँग्रेस नेते संतोष केणे, महिला संघटक वैशाली दरेकर, माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, शहरप्रमुख अभिजीत सावंत, माजी नगरसेवक जितेंद्र भोईर, नंदू म्हात्रे, हदयनाथ भोईर, किशोर मानकामे, प्रकाश तेलगोटे, माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, रत्ना म्हात्रे उपस्थित होते.