कल्याण : घरात मुलीची आई नाही पाहून वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीसमोर रात्रीच्या वेळेत नग्न होऊन अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकाराने अल्पवयीन मुलगी घाबरली. तेवढ्यात तिच्या आईचा फोन वडिलांना आला. त्यावेळी मुलगी रडत होती. आईने मुलीला रडण्याचे कारण विचारले तर वडील घरात नग्न अवस्थेत असल्याचे तिने आईला सांगितले. या प्रकाराबद्दल मुलीच्या आईने आपल्या पती विरुध्द बुधवारी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तक्रार दाखल होताच गुन्हा दाखल करून घरात विकृत चाळे करणाऱ्या वडिलांना अटक केली आहे. मार्चमध्ये हा प्रकार पीडित मुलीच्या घरात घडला होता.

याप्रकरणी मुलीच्या आईने बुधवारी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.पोलिसांनी सांगितले, कल्याण पूर्वेतील मलंग रस्त्यावरील काका ढाबा परिसरात एक कुटुंब राहते. घरात ३६ वर्षाचे पती आणि त्यांची तेवढ्याच वयाची पत्नी राहते. त्यांना एक अल्पवयीन मुलगी आहे. पत्नी नागपूर येथे शिक्षण घेते. या कालावधीत घरात अल्पवयीन मुलीचा सांभाळ या महिलेचा पती करतो. मार्च महिन्यात पत्नी नागपूर येथे अल्पवयीन मुलीला पतीजवळ ठेऊन शिक्षणासाठी गेली. मुलीचा योग्यरितीने सांभाळ करणे हे पतीचे काम होते.

हे ही वाचा…घोडबंदर मार्गावरील उड्डाणपूलावर पुन्हा अपघात, एसटी बसगाडी कठड्याला धडकली

नागपूर येथे असताना पत्नीने आपल्या पतीच्या मोबाईलवर व्हिडिओने संपर्क केला. मुलगी कशी आहे, अशी विचारपूस केली. आईचा फोन आल्याचे कळल्यावर भेदरलेल्या मुलीने रडण्यास सुरूवात केली. पत्नीला मुलीच्या मोठयाने रडण्याचा आवाज आला. तिने पतीला मुलगी का रडते असे प्रश्न केले. तिने पतीला मोबाईल मुलीच्या दिशेने फिरवायला सांगितला. त्यावेळी ती दृश्यचित्रफितीमध्ये घाबरलेली आणि खूप रडत असल्याचे दिसले.

हे ही वाचा…वाहतूक पोलिसांना ठोस उपाय मिळेना, नियोजनशुन्य कारभारामुळे प्रवास नकोसा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिने पतीला मोबाईल मुलीच्या ताब्यात देण्यास सांगितले. मुलीला तिने बाळा तू का रडत आहेस अशी विचारणा केली. तिने आईला सांगितले, रात्रीच्या वेळेत बाबांनी अंगावरील सर्व कपडे काढून टाकले होते. ते बिछान्यावर पडून होते. त्या गोष्टीची मला खूप भीती वाटत आहे. त्यामुळे आपण रडत असल्याचे आईला सांगितले. हा सगळा प्रकार पाहून पीडित मुलीच्या आईला धक्का बसला. तिने याविषयी पतीची कानऊघडणी केली. नागपूर येथून मुलीची आई कल्याणमध्ये आल्यावर तिने बुधवारी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन पती विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्याने गुन्हा दाखल करून पीडित मुलीच्या वडिलांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गोरे तपास करत आहेत