डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील शिळफाटा रस्त्यावरील निळजे गाव हद्दीत एका जवाहिऱ्याच्या दुकानाच्या जाहिरात फलकावर कळवा येथील मेसर्स ए. डी. प्रमोशन ॲडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस एजन्सीने पालिकेची परवानगी न घेता पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रिय घोषणांची जाहिरात झळकवली होती. याविषयी निवडणूक आयोगाच्या सीव्हिजील उपयोजनवर सोमवारी तक्रार प्राप्त होताच, आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी संबंधित जाहिरात रात्रीतून उतरवून त्या जाहिरात एजन्सीवर मालमत्तेचे विद्रुपीकरण आणि आचारसंहिता भंग प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने पोलिसांंनी गुन्हा दाखल केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका जाहिरात एजन्सी विरुध्द आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल झाल्याची ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील ही पहिली घटना आहे. पोलिसांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीची आचारसंंहिता लागू असल्याने कोणत्याही राजकीय पक्षाला परवानगी घेऊनच जाहिरात करण्याची परवानगी आहे. सोमवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाच्या सीव्हिजील या उपयोजनवर डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील निळजे गाव हद्दीत विना परवानगी पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेची फलक लागलेली आहेत, अशी तक्रार प्राप्त झाली होती.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Thane municipal corporation, commissioner, action against illegal construction, Thane
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर हातोडा
dombivli marathi news, ayregaon chawl demolished marathi news
डोंबिवलीत आयरेगावातील बेकायदा चाळी जमीनदोस्त, मढवी बंगल्याजवळील सात माळ्याच्या बेकायदा इमारतीवर कारवाई
snatched compensation of 11 crores of land in Nilje village near Dombivli on name of dead person
डोंबिवलीजवळील निळजे गावात मयत व्यक्तीच्या नावाने जमिनीचा ११ कोटीचा मोबदला लाटला

हेही वाचा : “कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर

या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार आणि फेरीवाला हटाव पथकातील सर्जेराव जाधव, गणपत गायकवाड, प्रकाश म्हात्रे, गणेश दळवी, अमित गायकर, विलास पाटील, रतन खुडे, भगवान पाटील असे पथक शिळफाटा रस्त्यावरील संबंधित जाहिरात फलक शोधण्याच्या कामासाठी लागले. सोमवारी रात्री नऊ वाजता त्यांना शिळफाटा रस्त्यावरील निळजे गाव हद्दीत एका जवाहिऱ्याच्या अधिकृत फलकावर १२ मजली उंचीचा ४० बाय ४० फूट लांबी रूंदीचा फलक लावलेला आढळला. या फलकावर ‘मोदींनी चार कोटी पक्की घरे बांधली आहेत. आणखी बांंधली जातील. ही मोदींची गॅरंटी आहे. पुन्हा मोदी सरकार स्थापन करा,’ असा पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेसह मजकूर लिहिलेला आढळला.

हेही वाचा : उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी

साहाय्यक आयुक्त पवार यांनी या जाहिरात फलकाच्या अधिकृततेविषयी मालमत्ता विभागाकडे चौकशी केली. त्यावेळी हा फलक कळवा खारीगाव येथील मे. ए. डी. प्रमोशन जाहिरात एजन्सीने लावला असल्याचे आणि त्यांनी हा फलक लावताना पालिकेची परवानगी घेतली नसल्याचे उघड झाले. पालिका हद्दीत विनापरवानगी जाहिरात फलक लावून मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याने आणि आचारसंंहितेचा भंग केल्याने साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी मे. ए. डी. प्रमोशन जाहिरात एजन्सी विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.