डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील प्रीमिअर मैदानात रविवारी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध पालिका क्षेत्रातील शेकडो लाभार्थी नागरिक यावेळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वाहतूक विभागाने शिळफाटा रस्त्यावरील जड, अवजड वाहतूक रविवारी (ता.3) सकाळी पाच ते रात्री ११ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या रस्त्यावरून जाणाऱ्या जड, अवजड वाहनांना वाहतूक विभागाने पर्यायी मार्गाने जाण्याच्या सूचना केल्या आहेत. हलकी वाहने फक्त या रस्त्यावरून सुरू राहणार आहेत. वाहतूक विभागाचे पोलीस उपयुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी यासंदर्भातची अधिसूचना शुक्रवारी प्रसिध्द केली आहे. आठवडाभरात शिळफाटा रस्ता दुसऱ्यांदा बंद राहत असल्याने मालवाहतूक चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात बालाजी महोत्सवासाठी हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता.

HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

हेही वाचा : नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना

प्रवेश बंद व पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत.

मुंब्रा, कल्याण फाटा येथून कल्याण, डोंबिवलीकडे जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने मुंब्रा वळण रस्ता, खारेगाव येथून मुंबई-नाशिक महामार्गाने इच्छित स्थळी जातील. भिवंडी, दुर्गाडी येथून पत्रीपूल मार्गे शिळफाटा दिशेने जाणाऱ्या वाहनांना दुर्गाडी चौक येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने दुर्गाडी चौकातून खडकपाडा मार्गे इच्छित स्थळी जातील. वालधुनी चौकातून आनंद दिघे पुलावरून जाणाऱ्या जड वाहनांना वालधुनी चौक येथे प्रवेश बंद. ही वाहने उल्हासनगर सुभाष चौकमार्गे जातील.

हेही वाचा : कल्याण जवळील मलंगगडाच्या पायथ्याशी गुटख्याचा कारखाना, सात लाखांच्या गुटख्यासह तीन जण अटकेत

विठ्ठलवाडी, श्रीराम चौकमार्गे कोळसेवाडीकडे जाणाऱ्या सर्व जड वाहनांना श्रीराम चौक येथे प्रवेश बंद. ही वाहने उल्हासनगर, शहाड, अंबरनाथ मार्गे जातील. नेवाळी नाका येथून कोळसेवाडी भागात जाणाऱ्या जड वाहनांना नेवाळी नाका येथे प्रवेश बंद. ही वाहने बदलापूर, अंबरनाथमार्गे जातील. तळोजा निसर्ग ढाबा खोणी मार्गे जाणाऱ्या जड वाहनांना खोणी निसर्ग ढाबा येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने बदलापूर, अंबरनाथ, काटई बदलापूर चौक, लोढा पलावा कल्याण फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.