कल्याण : कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्या प्रकरणातील आणखी एक आरोपी आमदार गायकवाड यांचा चालक रणजित यादव याला भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर येथून शनिवारी अटक केली. या अटकेने हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणातील अटक आरोपींची एकूण संख्या पाच झाली आहे.

गेल्या आठवड्यात घटना घडल्यानंतर आमदार गणपत गायकवाड, खासगी अंगरक्षक हर्षल केणे, आमदारांच्या माध्यम विभागातील संदीप सरवणकर, विक्की गणोत्रा या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी महेश गायकवाड यांचे समर्थक चैनू जाधव यांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एकूण सात आणि त्यांच्या साथीदारांना आरोपी करण्यात आले आहे.

Crime against former minister Anil Deshmukh wardha
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा? आदर्श आचारसंहिता…
sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?

हेही वाचा : वाहतूक कोंडी मुक्तीसाठी शिळफाटा ते कोन डबर डेकर रस्त्याची उभारणी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

जिल्ह्यातील गु्न्हे शाखेची सर्व पथके या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहेत. १४ फेब्रुवारीला आमदार गायकवाड यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत आहे. तत्पपूर्वी सर्व आरोपींना अटक करण्याचे तपास पथकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणातील आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड, नागेश बडेकर हे आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. मागील अकरा दिवसापू्वी आमदार गणपत गायकवाड यांनी राजकीय वैमनस्य आणि जमिनीच्या वादातून शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता सुधारत आहे.