कल्याण : कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे शहरप्रमुख आणि कट्टर समर्थक महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शनिवारी गोळीबाराची घटना घडल्याने, या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याण लोकसभेचे खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांनी रविवारी वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

रविवारी खासदार शिंदे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने कल्याण लोकसभा हद्दीतील विधानसभा मतदारसंघाप्रमाणे भव्य क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे अविश्रांत श्रीकांत हा खासदार शिंदे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पुंडलिक पै फ्रेन्डस लायब्ररीतर्फे आयोजित केला होता. मुलाखतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा : ठाणे – बोरिवली दुहेरी बोगद्याच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा, अखेर केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली

सावळाराम महाराज क्रीडासंकुलात क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाचा होणारा कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन खासदार शिंदे यांनी केले आहे. या क्रीडा संग्रामाचे भव्य स्वरुपात उद्घाटन करण्याचे नियोजन होते. जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत या स्पर्धांचे उद्घाटन केले जाणार आहे.

आपल्या वाढदिवसा निमित्त शिवसैनिकांनी कोठेही भव्य कार्यक्रम आयोजित करू नयेत. आहे त्या ठिकाणाहून आपणास शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन खासदार शिंदे यांनी केले आहे. खासदारांच्या वाढदिवसा निमित्त कल्याण, डोंबिवली,अंबरनाथ शहरांमध्ये शिवसैनिकांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. महिला आघाडीने स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हे सर्व कार्यक्रम रद्द किंवा साधेपणाने करण्याचे आवाहन खासदार शिंदे यांनी केले आहे.

हेही वाचा : पालकमंत्री शंभूराज देसाई आज घेणार जखमी महेश गायकवाडांची भेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण पूर्वेत शांतता

गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व भागात स्थानिक पोलीस, विशेष, राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्या तिसगाव येथील तिसाई हाऊस, त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, महेश गायकवाड यांच्या निवास, कार्यालयाबाहेर पोलीस तैनात आहेत. कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची काळजी पोलीस घेत आहेत.