ठाणे : घोडबंदर भागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी नरेश मनेरा यांच्यासह १० ते १२ जणांविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश मनेरा हे माजी नगसेवक असून त्यांनी ठाण्याचे उपमहापौरपदही भूषवले होते.  पिडीत महिला घोडबंदर भागात राहते. याच भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा-माजीवडा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख नरेश मनेरा यांनी महाराष्ट्र उत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

हेही वाचा >>> पुणे : शिवसेनेच्या मध्यस्थीनंतर संभाजी ब्रिगेडची माघार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री त्या घरामध्ये असताना त्यांना कार्यक्रमातील ध्वनीक्षेपकाच्या आवाजाचा त्रास झाला. त्यामुळे त्या कार्यक्रम बंद करण्यासाठी नरेश मनेरा यांना भेटण्यासाठी गेल्या. त्यावेळी तेथील महिलांनी त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच नरेश मनेरा यांच्यासह १० ते १२ महिला आणि पुरुषांनी गर्दीमध्ये त्यांचा विनयभंग केला. या प्रकारादरम्यान गळ्यातील सोनसाखळीही चोरीला गेल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणात कोणालाही अटक नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.