इमारतीचा स्लॅब कोसळून उल्हासनगरात एकाचा मृत्यू

यापूर्वी दुर्घटना घडलेल्या इमारतींप्रमाणेच ही इमारतही धोकादायक इमारतींच्या यादीत नसल्याचे कळते.

उल्हासनगर: उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागातील पारस पॅलेस या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील सदनिकेचा स्लॅब चौथ्या मजल्यावर कोसळून शनिवारी रात्री  २५ वर्षीय रहिवाशाचा मृत्यू झाला, तर आणखी एक रहिवासी जखमी झाला आहे. या घटनेनंतर ही इमारत रिकामी करण्यात आली.  पारस पॅलेस ही पाच मजली इमारत  १९९५ साली बांधली होती.  पाचव्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्यानंतर चौथ्या मजल्यावर राहत असलेले आकाश पोपटानी  यांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आकाश यांना बाहेर काढून मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, तर एका जखमी रहिवाशाला रुग्णालयात दाखल केले आहे. यापूर्वी दुर्घटना घडलेल्या इमारतींप्रमाणेच ही इमारतही धोकादायक इमारतींच्या यादीत नसल्याचे कळते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: One dies in ulhasnagar after building slab collapses zws

ताज्या बातम्या