two men arrested for raping 17 year old girl at thakurli by posing as cops zws 70 | Loksatta

ठाकुर्लीत सामूहिक बलात्कार; दोन आरोपींना अटक

तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी डोंबिवली पूर्व, कल्याण परिसरातून दोन्ही आरोपींना अटक केली.

ठाकुर्लीत सामूहिक बलात्कार; दोन आरोपींना अटक
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

डोंबिवली : ठाक्रु्ली रेल्वे स्थानकाजवळील निर्जन स्थळी एका १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन तरुणांना विष्णुनगर पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली. बलात्काराची घटना शुक्रवारी दुपारी घडली होती.

विष्णू भांडेकर (२५) आणि, आशीष गुप्ता (३२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विष्णू हा सराईत गुन्हेगार आहे. गेल्या वर्षी विष्णुनगर पोलिसांनी त्याला डोंबिवलीतील विजय सोसायटी भागात आठ लाखांच्या घरफोडी प्रकरणात अटक केली होती.  डोंबिवली पूर्वेतील बारावीत मुलगी आणि तिचा मित्र शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी विष्णू आणि आशीष यांनी तिला आणि तिच्या मित्राला पोलीस असल्याची बतावणी करून धमकाले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी मोबाइलमध्ये चित्रण करून ते समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याचीही धमकी दिली. रेल्वे सुरक्षा जवानाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीला आला. त्यानंतर विष्णुनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी डोंबिवली पूर्व, कल्याण परिसरातून दोन्ही आरोपींना अटक केली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 02:27 IST
Next Story
डोंबिवली- ठाकुर्ली सामुहिक बलात्कारातील दोन आरोपी अटक