दिवा येथे रेल्वे फाटक ओलांडत असताना उपनगरीय रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू तर एकजण जखमी झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. दिपक शशिकांत सावंत (वय २७), गिता शिंदे (वय २८) यांचा मृत्यू झाला असून महादेवी जाधव (वय २५) यात जखमी झाल्या आहेत.

जीव धोक्यात टाकून अनेक जण फाटक ओलांडतात

दिवा रेल्वे स्थानक परिसरात येण्यासाठी अनेकजण फाटक ओलांडत असतात. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शशिकांत, गिता आणि महादेवी हे तिघेही फाटक ओलांडत असताना उपनगरीय रेल्वेगाडीची त्यांना धडक बसली. या धडकेत शशिकांत, गिता यांचा मृत्यू झाला. तर महादेवी गंभीर जखमी आहेत.

जखमींवर उपचार सुरु

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रेल्वे स्थानकातील अरुंद जिन्यामुळे तसेच सरकते जिने नसल्याने प्रवासी फाटकातून ये-जा करत असतात, अशी माहिती संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय भोईर यांनी दिली.