ठाणे : विविध मागण्यांसाठी नाशिक येथील सातपूर भागातील एका कंपनीच्या कामगारांनी नाशिक ते मंत्रालय पर्यंत अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढला आहे. हे मोर्चेकरी गुरुवारी दुपारी ठाण्यात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी हातात फलक घेऊन त्या कंपनी विरोधात निदर्शने केली.

नाशिक जिल्ह्यातील सातपूर येथे ट्रॅक कंपोनेंट्स लि. कंपनी आहे. या कंपनीतील कामगारांनी विविध मागण्यासाठी मंत्रालयापर्यंत अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढला आहे. हे सर्व कामगार नाशिकहून २ जूनला निघाले असून गुरुवारी दुपारी ते ठाण्यात दाखल झाले.नितीन कंपनीच्या सेवा रस्त्यावर थांबून त्यांनी काही वेळ निदर्शने केली. कामगारांच्या हक्क नाकारणाऱ्या ट्रॅक कंपोनेंट्स लि. कंपनीचा निषेध त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंत्राटी कामगारांच्या कायद्यात बदल करुन कंत्राटी कामगारांना सुरक्षा द्यावी, स्थानिक कामगारावर अन्याय करण्या सातपूर येथील ट्रॅक कंपोनेंट्स लि. कंपनीचे बेकायदेशीर कंत्राट रद्द करावे, कंपनीने ४० टक्के भागात केलेले अतिक्रमण तत्काळ हटवावे, यूनियनच्या सर्व कामगारांना कायमस्वरुपी करावे अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. भर पावसात अर्धनग्न अवस्थेत आपल्या मागण्या सरकर दरबारी मांडण्यासाठी जाणाऱ्या या कामगारांकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.