लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: तरुणी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन शेजारील एका तरुणाने घरात जाऊन तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. डोंबिवली जवळील पिसवली गावात हा प्रकार घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच मानपाडा पोलिसांनी तरुणाला अटक केली.

सागर गाडे असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, पीडित तरुणी बहिणीच्या घरी पिसवली गावात राहते. दहावीत असताना परीक्षेचा तणाव सहन न झाल्याने तिचे मानसिक संतुलन बिघडले होते. वैद्यकीय उपचार करुन तिची मानसिक स्थिती आता सुस्थितीत झाली आहे. विवाहित बहिण आजारी असल्याने ती गावी गेली आहे. तिचे पती कामाला गेले होते. त्यामुळे पीडित तरुणी घरात एकटीच होती.

हेही वाचा… मनोज सानेला श्रद्धा वालकरसारखीच लावायची होती सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट; कबुलीजबाबात केले धक्कादायक दावे!

पीडित तरुणी एकटीच असल्याने पाहून आरोपी सागर तिच्या घरात गेला. तिच्यावर अत्याचार केला. पीडितीने ओरडा केल्यानंतर तो तेथून पळून गेला होता. असा दोन वेळा प्रकार आरोपीने पीडितेसंदर्भात केला होता. या प्रकरणी बाहेर कोठे वाच्छता केल्यास तरुणीला मारण्याची धमकी आरोपीने दिली होती.

हेही वाचा… खदखद जिल्ह्यात, स्फोट मात्र डोंबिवलीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिनाभरापासून आरोपी सागर पीडितेची छेडछाड करत होता. तिला धमकावत होता. हे प्रकार वाढत असल्याने पीडितेने घडला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी सागरच्या आई, वडिलांना त्याच्याकडून होणारा त्रास सांगितला. कुटुंबीयांनी माफी मागितल्यावर हा विषय मिटला होता. तरीही सागरने नंतर पुन्हा पीडितेला धमकावण्याचे प्रकार सुरू ठेवल्याने पीडितेच्या कुटुंबीयांना शुक्रवारी आरोपी सागर विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ सागरला अटक केली.