निसर्ग शिबिर
‘दि नेचर लव्हर्स’तर्फे ८ ते १५ वयोगटातील मुलांसाठी मुळशीजवळ ताम्हिणी घाटात निसर्ग शिबिराचे आयोजन केले आहे. १४ ते १७ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या शिबिरामध्ये गिर्यारोहण, पदभ्रमण, निसर्गवाचन, आकाशदर्शन, साहसी खेळांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी कक्षा खांडेकर (९८६९५३०१३१) किंवा मिलिंद परांजपे (९८९२३३७०५५) यांच्याशी संपर्क साधावा.
चला किल्ल्यांच्या भेटीला
दिवाळीची सुटी आणि किल्ल्यांचे नाते सर्वश्रूत आहे. यानिमित्ताने वसई परिसरातील १६ किल्ल्यांच्या भेटींच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान आयोजित या मोहिमेत अभ्यासकांच्या सोबतीने दररोज दुर्गदर्शन घडवले जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी सागर खरपुडे (९७६९२६५१८२), अमित (९३२०७५५५३९) यांच्याशी संपर्क साधावा.
साहस शिबिर
‘भोसला अॅडव्हेंचर फाउंडेशन’तर्फे येत्या ६ ते ११ नोव्हेंबर दरम्यान साहस शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात गिर्यारोहण, पदभ्रमण आदी साहसी खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी ०२५३-२३०९६१८, ९८८१५४७२८० या क्रमांकावर संपर्क साधावा.
‘टकमक’वर रॅपलिंग
‘गिरिविहंग ट्रेकर्स’ तर्फे येत्या ९ व १० नोव्हेंबर रोजी रायगडावरील टकमक टोकावर रॅपलिंगचे आयोजन केले आहे. दोराच्या साहाय्याने या कडय़ावरून ३०० फूट खाली उतरण्याचे साहस या उपक्रमातून केले जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी कुणाल शिंदे (९००४०००५२२) यांच्याशी संपर्क साधावा.
जामनगर पक्षिनिरीक्षण
गुजराथमधील जामनगर हे ऐतिहासिक स्थळ त्याच्या गौरवशाली इतिहासाबरोबरच देशोदेशीच्या येणाऱ्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. या भागातील निसर्ग निर्मित बेटे, समुद्र किनारे, पाणथळ जागांच्या परिसरात अनेक स्थानिक, स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन घडते. यामध्ये फ्लेमिंगो, पेलिकन्स, केन्स, ब्लॅकनेक स्टार्क, विविध प्रकारची बदके दिसतात. समुद्रीजीवनाची सैरही या सहलीत केली जाणार आहे. निसर्ग, पक्षिनिरीक्षण, छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही भ्रमंती मेजवानी ठरू शकते. या सहलीत जामनगरच्या गौरवशाली इतिहासाचेही दर्शन होणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Oct 2013 रोजी प्रकाशित
ट्रेक डायरी
‘दि नेचर लव्हर्स’तर्फे ८ ते १५ वयोगटातील मुलांसाठी मुळशीजवळ ताम्हिणी घाटात निसर्ग शिबिराचे आयोजन केले

First published on: 23-10-2013 at 08:47 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trek diary