‘जीविधा’ संस्थेतर्फे येत्या ६ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ओडिसामधील भितरकनिका  आणि चिल्का सरोवर येथील खारफुटीच्या जंगलातील वनस्पती आणि पक्ष्यांच्या अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. यातील भितरकनिका जंगलात  खारफुटीचे घनदाट जंगल असून, अनेक पशू-पक्ष्यांचा हा अधिवास आहे.  याला लागून असलेला शांत, स्वच्छ समुद्रकिनारा, कासव, मोठय़ा मगरी, पक्षीगण हे इथले वैशिष्टय़ आहे. चिल्का सरोवर हे आशियातील सर्वात मोठे ११० चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी राजीव पंडित (९४२१०१९३१३) यांच्याशी संपर्क साधावा.
ताडोबा सफारी
‘निसर्गसोबती’तर्फे २५ ते २७  डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्रातील प्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीचे आयोजन केले आहे. ताडोबाचे जंगल वाघांसाठी तर प्रसिद्ध आहेच, पण याशिवाय या जंगलात बिबटे, रानकुत्री, अस्वल, सांबर, चितळ, गवा हे  प्राणी तसेच अनेक प्रकारचे पक्षीही दिसतात. अधिक माहिती व नोंदणीसाठी अजय जोशी (९९३०५६१६६७) यांच्याशी संपर्क साधावा.

.